Men Fertility : महिलांची गर्भधारणा रोखण्यासाठी बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या आणि औषधं मिळतात. पण या जास्तीत जास्त गोष्टी महिलांसाठी बनवलेल्या असतात. पण आता वैज्ञानिकांनी अवेळी गर्भधारणा रोखण्यासाठी 'मेल बर्थ कंट्रोल पिल' म्हणजे पुरूषांचे स्पर्म कंट्रोल करणारी गोळी तयार केली आहे. या गोळीच्या माध्यमातून स्पर्मचं प्रॉडक्शन सुरक्षितपणे रोखलं जाऊ शकतं. वैज्ञानिकांनी एक असं तत्व तयार केलंय, जे अशा प्रोटीनला टार्गेट करतं जे स्पर्म तयार करतं. महत्वाची बाब म्हणजे जेव्हा हे औषध घेणं बंद कराल तेव्हा पुन्हा पुरूषांची फर्टिलिटी नॉर्मल होईल. हे औषध कसं काम करेल हे समजून घेऊया.
आतापर्यंत पुरूष पार्टनरची गर्भधारणा रोखण्यासाठी कंडोम किंवा मग नसबंदी हे पर्याय वापरत होते. हार्मोनल गोळ्यांचे प्रयोग याआधीही झालेत, पण त्यांच्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांमुळे ते बाजारात आलेच नाहीत. पण आता या नव्या रिसर्चमध्ये दावा करण्यात आलाय की, या नव्या गोळ्या नॉन-हार्मोनल आहेत, त्यामुळे यांचा शरीरावर दुष्परिणाम होणार नाही.
बेअलर कॉलेज ऑफ मेडिसिन एक्सपर्टकडून करण्यात आलेला रिसर्च सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झालाय. त्यानुसार, हे औषध टेस्टिकल्समध्ये असलेल्या एंझाइमची अॅक्टिविटी रोखतं. अशात जेव्हा ते एंझाइम ब्लॉक होतं, तेव्हा स्पर्मचं प्रॉडक्टशन थांबतं.
सध्या उंदरांवर या औषधाचा प्रयोग करण्यात आला. तेव्हा आढळून आलं की, औषध दिल्यानंतर उंदरांची फर्टिलिटी शून्य झाली होती. पण औषधाचा प्रभाव संपताच त्यांची क्षमता परत आली. हा शोध त्या पुरूषांसाठी वरदान ठरू शकतो ज्यांना सुरक्षित पण अस्थायी गर्भनिरोधक पर्यायाचा शोध आहे.
रिसर्चनंतर एक्सपर्ट्स सांगतात की, ही गोळी प्रभावी तर आहेच, सोबतच ती घेणंही सोपं आहे. सध्या महिला ज्या गोळ्या घेतात, त्यांमुळे त्यांच्या मूड स्विंग्स, वजन वाढणे आणि हार्मोनल असंतुलन अशा समस्या बघायला मिळतात. अशात ही पुरूषांच्या हार्मोन्समध्ये कोणताही बदल न करणारी ही गोळी मोठं यश आहे. पुरूषांवर ट्रायल करण्याआधी याचे आणखी काही क्लीनिकल ट्रायल होणार आहेत.
सामान्यपणे गर्भधारणा रोखण्याची जबाबदारी ही महिलांची मानली जाते. ज्यामुळे त्यांना शारीरिक आणि मानसिक दबावाचा सामना करावा लागतो. पण ही जबाबदारी त्यांनीच का घ्यावी? पुरूषांचा देखील त्यात वाटा असावा. आता ही नवीन गोळी आल्याने पुरूषही गर्भधारणा रोखण्यात महत्वाची भूमिका निभावू शकतील.
Web Summary : Scientists developed a male birth control pill that safely stops sperm production by targeting a protein. Fertility returns when medication ceases. Non-hormonal, it avoids side effects unlike past attempts. Trials on mice were successful. More trials are planned before release.
Web Summary : वैज्ञानिकों ने पुरुषों के लिए एक गर्भनिरोधक गोली विकसित की है जो एक प्रोटीन को लक्षित करके शुक्राणु उत्पादन को सुरक्षित रूप से रोकती है। दवा बंद करने पर प्रजनन क्षमता वापस आ जाती है। गैर-हार्मोनल होने के कारण, यह पिछले प्रयासों के विपरीत दुष्प्रभावों से बचाती है। चूहों पर परीक्षण सफल रहे। रिलीज से पहले और परीक्षणों की योजना है।