शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Bird Flu : कोरोनादरम्यान नवीन संकट! बर्ड फ्लूबाबत तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 11:02 IST

Bird Flu : वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर अ‍ॅनिमल हेल्थने (OIE) म्हटले आहे की, आशिया आणि युरोपमध्ये बर्ड फ्लूचे एकापेक्षा जास्त व्हेरिएंट असल्यामुळे ते मानवांमध्ये पसरण्याची शक्यता जास्त आहे.

नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायसरचा संसर्ग वाढत असताना बर्ड फ्लूबाबत (Bird Flu) तज्ज्ञांनी इशारा दिला आहे. वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर अ‍ॅनिमल हेल्थने (OIE) म्हटले आहे की, आशिया आणि युरोपमध्ये बर्ड फ्लूचे एकापेक्षा जास्त व्हेरिएंट असल्यामुळे ते मानवांमध्ये पसरण्याची शक्यता जास्त आहे.

वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर अ‍ॅनिमल हेल्थचे महासंचालक मोनिक एलॉइट म्हणाले, 'या वेळी परिस्थिती अधिक कठीण आणि अधिक धोकादायक आहे, कारण आम्ही पाहत आहोत की एकापेक्षा जास्त व्हेरिएंट समोर येत आहेत, ज्यामुळे यावर नियंत्रित करणे कठीण झाले आहे. जोखीम ही आहे की हा म्यूटेंट आहे किंवा तो मानवी फ्लू व्हायरसमध्ये मिसळतो, जो मानवापर्यंत पोहोचू शकतो आणि नंतर तो अचानक नवीन परिमाण घेतो.'

मिररच्या रिपोर्टनुसार, ऑक्टोबर ते डिसेंबरच्या अखेरीस, 15 देशांमध्ये पोल्ट्रीमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळून आला होता, ज्यात बहुतांश H5N1 स्ट्रेन होता. वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर अ‍ॅनिमल हेल्थच्या डेटानुसार, युरोपमध्ये 285 उद्रेकांसह इटलीत सर्वात वाईट परिणाम झाला होता आणि जवळपास चार मिलियन पक्षी मारले गेले. बर्ड फ्लू सहसा हिवाळ्यात सुरू होतो, जो जंगली पक्ष्यांच्या हालचालींद्वारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संसर्ग पसरतो.

नवीन स्ट्रेन मानवांमध्ये अधिक संसर्गजन्यवर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर अ‍ॅनिमल हेल्थने म्हटले आहे की, जवळपास 850 लोकांना बर्ड फ्लूच्या H5N1 व्हेरिएंटची लागण झाल्याची माहिती मिळाली होती. त्यापैकी निम्म्या लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षी चीनमध्ये अनेक लोकांना H5N6 स्ट्रेनची लागण झाली होती. यामुळे काही तज्ज्ञांची चिंता वाढली आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, आधीच प्रसारित होणारा स्ट्रेन बदलला आहे आणि लोकांसाठी अधिक संसर्गजन्य असू शकतो.

दरम्यान, 'बहुतेक देशांनी प्रादुर्भाव नियंत्रित करणे शिकले आहे आणि बर्ड फ्लू सहसा जवळच्या संपर्कातून जातो, कारण मानवांमध्ये संसर्ग तुरळक असेल. जर एक, दोन किंवा तीन लोकांना संसर्ग झाला असेल तर तो चिंताजनक आहे, मात्र, हे अवलंबून असेल की लोक कसे संक्रमित झाले आहेत', असे वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर अ‍ॅनिमल हेल्थचे महासंचालक मोनिक एलॉइट यांनी सांगितले. 

टॅग्स :Bird Fluबर्ड फ्लूcorona virusकोरोना वायरस बातम्या