शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

निम्म्यापेक्षा जास्त वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाच रुग्णालयांमध्ये वाटते भीती; सर्वेक्षणातून माहिती उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 15:30 IST

धक्कादायक बाब म्हणजे, सुमारे ७८ टक्के कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी धमकी मिळाल्याचे सांगितले

लाेकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: निम्म्यापेक्षा जास्त वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी असुरक्षित वाटते. विशेषत: राज्य आणि केंद्र सरकारच्या रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्यांमध्ये ही भावना जास्त आहे. दिल्लीतील एम्स आणि सफदरजंग रुग्णालयाच्या तज्ज्ञांनी केलेल्या एका सर्वेक्षणातून ही माहिती उघड झाली आहे. त्यातून देशातील रुग्णालयांमध्ये प्राथमिक सुरक्षेतील महत्त्वाच्या त्रुटींकडे लक्ष वेधण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, सुमारे ७८ टक्के कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी धमकी मिळाल्याचे सांगितले.

१,५६६ देशभरातील आराेग्य कर्मचारी सर्वेक्षणात सहभागी झाले.

  • महिला - ८६९
  • पुरुष - ६९७

 

  • ७१.५% - कर्मचारी सरकारी रुग्णालयात काम करतात.
  • ४९.२% - कर्मचारी बिगर शस्त्रक्रिया विभागात काम करतात.
  • ३३.८% - कर्मचारी शस्त्रक्रिया विभागातील आहेत.
  • ४९.६% - दिल्लीतील कर्मचाऱ्यांमध्ये निवासी डाॅक्टर.
  • १५.९% - प्रशिक्षणार्थी डाॅक्टर.

सरकारी रुग्णालये...

हा अहवाल ‘इपिडेमियाेलाॅजी इंटरनॅशनल’ नावाच्या नियतकालिकेत प्रसिद्ध झाला आहे. रुग्णालयांमध्ये सुरक्षा व्यवस्था आणि उपाययाेजनांमध्ये तत्काळ सुधारणा करण्याची गरज असल्याचे त्यात म्हटले. आयसीयू तसेच मानसिक रुग्णांच्या वाॅर्डमध्ये लाेकांची निर्वराेध ये-जा, निगरानी तसेच सुरक्षेबाबत गंभीर त्रुटी असल्याचे समाेर आले आहे.  खासगी रुग्णालयांच्या तुलनेत सरकारी रुग्णालयांमध्ये कर्मचारी सुमारे ४ पट नाराज असल्याचेही सर्वेक्षणात आढळले.

सर्वेक्षणात काय आढळले?

  • ५८.८ टक्के कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी असुरक्षित वाटते.
  • ७८.४ टक्के डाॅक्टरांना कामाच्या वेळी धमकी मिळाली.
  • ७० टक्के कर्मचाऱ्यांनी सांगितले की, सुरक्षा रक्षकांची संख्या अपुरी आहे.
  • ६२ टक्के कर्मचाऱ्यांनी आपत्कालीन अलार्म यंत्रणेबाबत असमाधान व्यक्त केले.
  • दीर्घकालीन व रात्रपाळीत काम करणाऱ्या निम्म्या कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र कक्ष नाही.
  • नियमित स्वच्छता, कीटक नियंत्रण, हवेशीरता, वातानुकूलित यंत्रणेच्या फार खराब सुविधा आहेत.
टॅग्स :doctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल