ेसुधारित .... कामाच्या ताणातून आत्महत्या केलेल्या डॉक्टरला मार्डची आर्थिक मदत
By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST
मुंबई: सोलापूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात बालरोगचिकित्सा विषयात पदव्युत्तर शिक्षण घेणार्या डॉ. किरण जाधव याने आत्महत्या केली. मध्यवर्ती मार्ड संघटनेने जाधव कुटुंबियांना आर्थिक मदत केली.
ेसुधारित .... कामाच्या ताणातून आत्महत्या केलेल्या डॉक्टरला मार्डची आर्थिक मदत
मुंबई: सोलापूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात बालरोगचिकित्सा विषयात पदव्युत्तर शिक्षण घेणार्या डॉ. किरण जाधव याने आत्महत्या केली. मध्यवर्ती मार्ड संघटनेने जाधव कुटुंबियांना आर्थिक मदत केली. गेल्या वर्षी १६ ऑगस्ट रोजी डॉ. किरण जाधव यांनी कामाचा ताण आणि त्रासामुळे आत्महत्या केली होती. त्यांनी ही कारणे सुसाईड नोटमध्ये नमूद केली होती. जाधव कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याचे राज्यातील साडेचार हजार निवासी डॉक्टरांनी ठरवले. त्यानुसार निवासी डॉक्टरांचा एक दिवसाचा पगार कापून घ्यावा, असे शिक्षण विभागाला कळवण्यात आले होते. राज्यातील १४ वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनी मिळून सुमारे ४५ लाख रुपयांची मदत जाधव कुटुंबियांनी केली आहे. (प्रतिनिधी)