शहरं
Join us  
Trending Stories
1
धडाकेबाज PSI 'बदने'वर बलात्काराचा आरोप! तस्करांना पकडणारा अधिकारी महिला डॉक्टरच्या मृत्यूनंतर फरार
2
'ते' खासदार कोण? महिला डॉक्टरने दोन पीएंची पोलिसांकडे केलेली लेखी तक्रार; आतेभावाचा मोठा खुलासा
3
भारतानंतर आणखी एक देश पाकिस्तानचे पाणी अडवणार, कुनार नदीवर धरण बांधण्याची तयारी सुरू
4
Honda vs Suzuki: होन्डा अ‍ॅक्टिव्हा आणि सुझुकी अ‍ॅक्सेसमध्ये चुरस; कोण आहे 'स्मार्ट फीचर्स'चा खरा किंग? वाचा
5
खळबळजनक दावा! सत्ताधारी २१ आमदारांना 'दिवाळी गिफ्ट'; एकाच ठेकेदारानं दिल्या आलिशान डिफेंडर कार?
6
चंद्रशेखर बावनकुळेंची भाजपा कार्यकर्त्यांना तंबी; "सर्वांचे व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हेलन्सवर..."
7
मुलगा की मुलगी? नवजात अर्भकांच्या अदलाबदलीवरून दोन कुटुंबांमध्ये हॉस्पिटलमध्येच वाद
8
हेअर फॉलचा वैताग! लसूण की कांद्याचा रस... काळ्याभोर लांब, जाड केसांसाठी सर्वात बेस्ट काय?
9
भारतीय नौदल चीन, पाकिस्तान, तुर्कीला धक्का देणार! तीन पावले उचलली
10
लग्नानंतर तापसी पन्नूने सोडला देश? डेन्मार्कला शिफ्ट झाल्याच्या चर्चांवर अभिनेत्रीचं स्पष्टीकरण
11
Numerology: ५, १४, २३ तारखेला जन्मलेल्या मुलींवर असतो बुधाचा प्रभाव; अत्यंत बुद्धिमान असतो स्वभाव!
12
विराट कोहली दोनदा शून्यावर बाद; सुनील गावसकरांनी मांडलं सडेतोड मत, म्हणाले- दोन सामन्यात...
13
VIDEO: देसी महिलेचा धुमाकूळ! 'हुस्न तेरा तौबा' गाण्यावर इतका विचित्र डान्स कधीच पाहिला नसेल
14
मोजतानाही लागेल धाप! IPO येण्याआधीचं Jio कंपनीचं मूल्यांकन बाप रे बाप...!
15
Railway: रेल्वे ट्रॅकजवळ रील बनवणाऱ्यांची आता खैर नाही; प्रशासनानं उचललं कठोर पाऊल!
16
मुख्यमंत्री फडणवीस अन् मनोज जरांगे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येणार? चर्चांना उधाण...
17
Shraddha Walker : "श्रद्धा वालकरवर अजूनही अंत्यसंस्कार झालेच नाहीत"; आफताबने ३ वर्षांपूर्वी केलेली निर्घृण हत्या
18
Satara Crime: महिला डॉक्टरवर अत्याचार करणारा पीएसआय गोपाल बदने फरार; महिला आयोगाने घेतली दखल
19
Social Media Earning: इन्स्टाग्राम आणि युट्यूबवरून कसे कमवता येतात पैसे? तुम्हीही बनू शकता लखपती! जाणून घ्या
20
सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगरमधील RSS कार्यालयावर वंचितचा जनआक्रोश मोर्चा

मानसिक आरोग्यासाठीचा निधी धूळखात; तीन वर्षांत केवळ ५.४ टक्के निधीचा विनियोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2022 06:39 IST

माहितीच्या अधिकारातून बाब उघड

 लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मानसिक आरोग्याच्या स्वास्थ्याविषयी आरोग्य विभागाची अकार्यक्षमता नुकतीच उघड झाली आहे. केंद्र शासनाकडून मानसिक आरोग्याच्या कार्यक्रमासाठी राज्याला मिळालेला निधी धूळखात असल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे. गेल्या तीन वर्षांत केवळ ५.४ टक्के निधीचा विनियोग करण्यात आला आहे.राज्य शासनाला केंद्राकडून २०१९-२०, २०२०-२१ आणि २०२१-२२ या तीन वर्षांत १०६.३१ कोटी रुपयांचा निधी मिळाला. तर त्या कालावधीत राज्य शासनानेही या कार्यक्रमासाठी ५१.५१ कोटींचा निधी दिला

आरोग्य विभागाने प्राप्त निधीतून केवळ ८.५९ कोटी रुपये खर्च केले आहेत. म्हणजेच एकूण निधीच्या केवळ ५.४ टक्के निधी खर्च केला आहे. ७२ पदे रिक्त राज्य मानसिक आरोग्य कार्यक्रम निवारण उपक्रमातील मानसिक आरोग्यविषयक शाखेतील २६० मंजूर पदांपैकी १८८ पदे भरलेली आहेत, तर ७२ पदे रिक्त असल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. त्यात १३ मानसोपचारतज्ज्ञ, ११ क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट, ११ मानसिक आरोग्य शाखेतील सामाजिक कार्यकर्ते, परिचारिका १७, संकलक १०, रजिस्ट्रार १० अशा पदांचा समावेश आहे.

राज्यातील अनेक मनोरुग्णालयांत मानसोपचारतज्ज्ञ नाहीत. शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागात विशेषत: उपेक्षित लोकसंख्या अधिक असलेल्या ठिकाणी मानसिक आरोग्य सुविधा नगण्य किंवा कमी आहे. अशा परिस्थितीत सरकारने मानसिक आरोग्य सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने कार्यक्रमाच्या अंमलबजावणीवर अधिक भर द्यायला हवा.- जितेंद्र घाडगे, प्रमुख, द यंग व्हिसलब्लोअर फाऊंडेशन

टॅग्स :mental hospitalमनोरूग्णालय