शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

पी.सी.ओ.एस.मुळे जडतात मानसिक विकार. वेळीच सावधान असलेलं बरं.

By madhuri.pethkar | Updated: November 9, 2017 18:41 IST

पी. सी. ओ .एस. संदर्भातला एक अभ्यास नुकताच प्रसिध्द झाला आहे. हा अभ्यास महिलांना या आजाराची गंभीर दखल घेण्यास सांगत आहे. त्याचं कारण म्हणजे या आजाराचे काही नवीन परिणाम संशोधनातून सिध्द झाले आहे. हे परिणाम महिलांना त्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्यास सूचित करत आहे.

ठळक मुद्दे* ज्या मुलींमध्ये, महिलांमध्ये पी.सी.ओ.एसची लक्षणं दिसतात त्यांनी लगेचंच या आजारावर औषधोपचार करायला हवेत. तसेच मानसोपचार तज्ञ्ज्ञांचा सल्लाही नियमितस्वरूपात घ्यायला हवा.* पी.सी.ओ.एस या आजाराशी सामना करता करताच जर मूल जन्माला आलं तर जन्माला येणा-या बाळाच्या मेंदू विकासावरही परिणाम होतो.

माधुरी पेठकर.पी. सी. ओ .एस. पी.सी.ओ.डी. अर्थात पॉलिसिस्टीस ओव्हरी सिंड्रोम किंवा पॉलिसिस्टीस ओव्हरी डिसीज या संकल्पना आता सगळ्यांच्याच परिचयाच्या झाल्या आहेत. महिलांशी संदर्भात असलेला हा विकार, त्याचं स्वरूप आणि त्याचे परिणाम इतके व्यापक आहेत की त्यावर सतत अभ्यास होत असून त्या अभ्यासाचे निष्कर्ष नियमित प्रसारित होत असतात.

यासंदर्भातला एक अभ्यास नुकताच प्रसिध्द झाला आहे. हा अभ्यास महिलांना या आजाराची गंभीर दखल घेण्यास सांगत आहे. त्याचं कारण म्हणजे या आजाराचे काही नवीन परिणाम संशोधनातून सिध्द झाले आहे.अभ्यासकांच्या मते पी.सी.ओ.एसमुळे मानसिक आजार, असंतुलन वाढतं. पी.सी.ओ.एस मुळे वंध्यत्व, अनियमित पाळी, शरीरावर अनावश्यक केस यासारखे परिणाम दिसतात. पी.सी.ओ.एस या आजाराशी सामना करता करताच जर मूल जन्माला आलं तर जन्माला येणा-या बाळाच्या मेंदू विकासावरही परिणाम होतो.

 

ज्या मुलींमध्ये, महिलांमध्ये पी.सी.ओ.एसची लक्षणं दिसतात त्यांनी लगेचंच या आजारावर औषधोपचार करायला हवेत. तसेच मानसोपचार तज्ञ्ज्ञांचा सल्लाही नियमितस्वरूपात घ्यायला हवा. जगभरात 5 ते 10 टक्के महिलांना हा पी.सी.ओ.एस. आजार जडला आहे. या आजारात महिलांच्या शरीरात पुरूषी संप्रेरकांचं प्रमाण वाढतं. ज्याचा थेट परिणाम त्यांच्या प्रजोत्पादन क्षमतेवर होतो. पाळी अनियमित होवून चेहे -यावर आणि शरीरावर इतरत्र अनावश्यक केस, काळे डाग यांचं प्रमाण वाढतं.

 

 

आता तर यासंदर्भातल्या नवीन अभ्यासानं या विकाराचा महिलांच्या मानसिक आरोग्यावर होणा-या परिणामांवर प्रकाश टाकला आहे. तसेच गरोदरपणात महिलांच्या शरीरात टेस्टोस्टेरोन या संप्रेरकाची पातळी वाढली तर त्याचा परिणाम गर्भाच्या मेंदू विकासावर होतो आणि मुलांमध्ये आॅटिझम नावाचा विकारही विकसित होवू शकतो. या अभ्यासात पी.सो.ओ.एस.मुळे जगभरात 17000 महिलांना मानसिक असंतुलनाला तोंड द्यावं लागत आहे.या अभ्यासात गेल्या सहा महिन्यापासून पी.सो.ओ.एस. च्या लक्षणांचा सामना कराव्या लागणा-या मुलींचा, महिलांचा समावेश केला गेला. या महिलांची तुलना ही लक्षणं नसलेल्या महिला मुलींशी केली असता पी.सी.ओ.एस.ची लक्षणं असलेल्या महिलांमध्ये मानसिक असंतुलन आढळून आलं आहे. या महिलांमध्ये भीतीग्रस्तता, विमनस्कता ( डिप्रेशन) आढळून आली.

पी.सो.ओ.एस.नं बाधित महिलांनी जन्म दिलेल्या बहुतांश मुलांमध्ये आॅटिझमची लक्षणं दिसून आलीत. अशा महिलांनी या पी.सी.ओ.एस.ची लक्षणं दिसल्याबरोबरच मानसिक असंतुलनावरही उपचार घ्यायला हवे होते असं अभ्यास सांगतो.

त्यामुळे पी.सी.ओ.एस. आहे म्हटल्यावर या विकारावर जसे औषधोपचार घ्यावे लागतात तसेच या आजारातून निर्माण होणा-या मानसिक आजारावरही आधीच उपचार घ्यायचे असतात. या विकाराशी असं दोन्ही पातळीवरून लढल्यास या विकाराच्या दुष्परिणामांची तीवता मोठ्या प्रमाणात कमी होते.