शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

​मराठी चित्रपट सध्या यशोशिखरावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2016 19:50 IST

करण मिश्रा : दाक्षिणात्य चित्रपटांनाही टाकले मागे

करण मिश्रा : दाक्षिणात्य चित्रपटांनाही टाकले मागेजळगाव : सध्या मराठी चित्रपट सृष्टी एका उंचीवर असून तयार होणाऱ्या वैचारिक चित्रपटांमुळे मराठी चित्रपट यशोशिखर गाठत आहे. या चित्रपटांनी दाक्षिणात्य चित्रपटांनाही मागे टाकले आहे, असे  हिंदी चित्रपट अभिनेता तथा मॉडेल करण मिश्रा यांनी सांगितले. जळगावात एका कार्यक्रमासाठी करण आलेले असताना त्यांच्याशी ‘लोकमत’ने बातचित केली. त्यावेळी त्यांच्याशी प्रश्नोत्तराच्या स्वरुपात झालेला हा संवाद....प्रश्न- या क्षेत्रात संधी कशी मिळाली?करण- एका कंपनीच्या जाहिरातीच्या चित्रीकरणासाठी ऐनवेळेवर संबंधित मॉडेल आला नाही, त्यावेळी मला त्या ठिकाणी बोलविण्यात आले व तेथून माझ्या या कामाला सुरुवात झाली. त्यानंतर हळूहळू मालिका व चित्रपटात काम सुरू झाले. प्रश्न- पहिला चित्रपट कोणता?करण- २०१३ मध्ये सलीम रजा दिग्दर्शित वॉण्टेड हा माझा पहिला चित्रपट आला. त्यामध्ये सर्व कलाकार नवीन होते. प्रश्न- उत्तम आरोग्यासाठी काय सांगाल?करण- आहार महत्त्वाचा असून सोबतच खेळ आणि धावणे नित्याचे ठेवले पाहिजे. सोबतच दररोज सकाळी उठल्याबरोबर दोन चमचे आवळा रस व कोमट पाणी मीदेखील घेतो व ते सर्वांनी घ्यावे. प्रश्न- अभिनेत्यांनी गुटखा, मद्य यांच्या जाहिराती करणे योग्य आहे का?करण- या जाहिराती अभिनेत्यांनी करणे चुकीचेच आहे. कारण आजची तरुण पिढी त्यांना जास्त फॉलो करते. प्रश्न- चांगल्या चित्रपटांसाठी काय व्हावे, असे तुम्हाला वाटते? करण- दर्जेदार चित्रपटांवर अधिक भर दिला पाहिजे. कथेवर लक्ष देऊन, विशेष मेहनत घेतल्यास हिंदी चित्रपटही हॉलिवूडला तोड देऊ लागले आहे.  निर्मात्यांनी सामाजिक भानदेखील ठेवले पाहिजे. प्रश्न- नवीन कलाकारांना काय संदेश द्याल?करण- तरुणांनी अगोदर आपल्या शिक्षणावर लक्ष दिले पाहिजे. कोठेही अपयश आले तर आपल्याला शिक्षणाचीच पदवी कामा येऊ शकते. त्यानंतर आरोग्याची विशेष काळजी घ्या. चित्रपट सृष्टीत येण्याच्या मोहात थेट तेथे पोहचण्यापेक्षा अगोदर स्थानिक पातळीवर कला सादर करा.