शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
2
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
3
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
4
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
5
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
6
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
7
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
8
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
9
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
10
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
11
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
12
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
13
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
14
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
15
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
16
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
17
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
18
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
19
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
20
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश

पोटफुगीवर करा घरगुती उपाय. हे आठ उपाय केले तरी पोटफुगी कमी होते.

By admin | Updated: June 9, 2017 18:56 IST

आपल्या काही सवयी काढून टाकून आणि स्वत:ला नव्या सवयी लावून घराच्या घरी पोटफुगी कमी करता येते.

- माधुरी पेठकरअनेकांना आपल्या पोटाकडे पाहून आपण जाड झाल्यासारखं सारखं वाटत असतं. सतत फुगलेल्या पोटामुळे मनात कायम अस्वस्थता असते. आपल्या फुगलेल्या पोटावर डॉक्टरच काय तो इलाज करू शकतील असंही अनेकांना वाटतं.फुगलेलं पोट ही काही मोठी शारीरिक समस्या नाहीये. मुळात आहार आणि विहारात दोष निर्माण झाले की ही समस्या डोकं वर काढते. पोट फुगण्यामुळे एकूण व्यक्तिमत्त्व बेढब दिसतं यामुळे खरी अस्वस्थता येते. डॉक्टरांकडे न जाताही पोट फुगीवरचे उपाय आपण घरच्याघरी आपल्या काही सवयी काढून टाकून आणि स्वत:ला नव्या सवयी लावून घेवून करता येतात.

 

                   पोट फुगतं काय करायचं?

1. मीठ हे पोट फुगीत महत्त्वाची भूमिका बजावतं. योग्य प्रमाणात मीठ हे शरीराला हवं असतं. पण थोडं जरी मीठ जास्त झालं तर ते शरीरात दोष निर्माण करतं. शरीरात मीठाच्या रूपानं जाणार सोडियमचं प्रमाण कमी केलं, नियंत्रणात ठेवलं तरी पोटफुगी कमी होते. बहुतेकांच्या पोटफुगीचं कारण हे मीठाचं अतिरिक्त प्रमाण हेच असतं. मीठामुळे पाणी साचून राहतं. त्यामुळेही पोट फुगी होते. म्हणूनच भाज्या आमट्यांमध्ये मीठ प्रमाणात टाकणं, वरून मीठ भुरभुरून खाणं, वेफर्स, कॉटेज चीज, सोया सॉस, हॉट डॉग्ज यसारख्या पदार्थात अतिरिक्त मीठ असतं , त्यामुळे हे पदार्थ कमी खाणं किंवा अजिबात न खाणं इष्टच. 2. शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी झालं तरी पोट फुगतं. पाणी कमी प्यायलं गेलं, जेवणात कोरडेच पदार्थ खाल्ले गेले तरी पोट फुगतं. म्हणूनच योग्य प्रमाणात पाणी प्यावं, कलिंगड, मोसंबी, डाळिंब या फळांचे ज्यूस नियमित घ्यावं. शरीराला जर योग्य प्रमाणात पाणी मिळालं तर बध्दकोष्ठताही होत नाही. पाणी कमी प्यायल्यानं बध्दकोष्ठता होते आणि यामुळेही पोट फुगल्यासाखं वाटतं. म्हणूनच योग्य प्रमाणात पाणी पिणं गरजेचं आहे. 3. आपण घेत असलेल्या आहारामुळेही पोट फुगी होते. बीन्स, ब्रोकोली, कांदा, लसूण यासारख्या भाज्यांचं अतिप्रमाणात सेवन केल्यानं पोटात गॅसेस तयार होतात. त्यामुळेही पोट फुगतं. अनेकांना दूध, दही, लस्सी, चीज, आइस्क्रिम यासारखे डेअरीचे पदार्थ सेवन केल्यामुळेही पोटफुगीचा त्रास होतो. असं असेल तर आवडत असूनही अशा पदार्थांना लांब ठेवणंच फायद्याचं ठरतं. 4. तुमच्या रोजच्या आहारातून शरीराला फायबर ( तंतूमय घटक) किती मिळतं यावरही पोटफुगी अवलंबून असते. म्हणूनच रोजच्या आहारात भरपूर फायबर असल्या भाज्या आणि फळं खाणं महत्त्वाचं ठरतं. फायबरमुळे बध्दकोष्ठता होत नाही. आणि त्यामुळे पोटफुगी होत नाही. 5. खाण्याच्या पदार्थांबरोबरच खाण्याच्या सवयीकडेही लक्ष द्यायला हवं. कामाची घाई असते म्हणून उभ्या उभ्या नाश्ता करणं, जेवण दोन तीन मीनिटात आटपण यासारख्या सवयींमुळे पोटफुगी होते. त्यामुळे एकाजागी शांतपणे बसून, सावकाश, चावून चावून खाणं गरजेचं असतं.6. पोटफुगी वाटत असल्यास वरचेवर अननस खावं. अननस हे उष्णकटिबंधातलं फळ आहे. अननसात असलेल्या घटकांमुळे प्रथिनांचं पचन होतं. पचनाची क्रिया सुलभ होते. पचन जर व्यवस्थित झालं तर मग पोटफुगीसारखे विकार होत नाही. 7. दिवसभर शरीराची अजिबात हालचाल न करता एका जागी बसून काम करणं, शरीराला अजिबात व्यायाम नसणं यामुळेसुध्दा पोटफुगी होते. रोज किमान 30 ते 45 मीनिटांचा व्यायाम शरीराला हलकं फुलकं ठेवतो. व्यायामामुळे पोटाकडील चरबी कमी होते. पोटाकडील चरबी वाढल्यामुळेही पोट फुगल्यासारखं वाटतं. 8 अतिप्रमाणात अल्कोहोलचं सेवन केल्यानं डिहायडे्रशन होतं. आणि त्यामुळेही पोट फुगी होते. त्यामुळे अल्कोहोलचं कमी सेवन करावं.