मुलांपासून स्मार्टफोन ठेवा लांब
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2016 18:40 IST
जर आपला मुलगा रडत असेल आणि स्मार्टफोन दिल्यानंतर रडणे थांबवत असेल तर आपला हा उपाय बदलण्याची गरज आहे. कारण स्मार्टफोन देऊन मुलांना शांत करणे हे चुकीचे आहे
मुलांपासून स्मार्टफोन ठेवा लांब
जर आपला मुलगा रडत असेल आणि स्मार्टफोन दिल्यानंतर रडणे थांबवत असेल तर आपला हा उपाय बदलण्याची गरज आहे. कारण स्मार्टफोन देऊन मुलांना शांत करणे हे चुकीचे आहे. आई-वडिलांनी याकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे. अमेरिकन बालरोग अॅकॅडमीने नुकत्याच एक अभ्यासादरम्यान काही दिशा-निर्देश जाहीर केले आहेत. त्यानुसार डिजिटल मीडियाचा जास्त वापर, मुलांची झोपेची गुणवत्ता, मुलांचा विकास आणि शारीरिक स्वास्थ्य यासाठी नुकसानकारक आहे. संशोधकांच्या मते विशेषप्रसंगी विमान प्रवास किंवा संशोधन प्रक्रियेदरम्यान डिजीटल मीडिया उपकरणांचा वापर करणे सुखदायक असते, मात्र आई-वडिलांनी मुलांना शांत करण्यासाठी या पयार्यापासून लांब राहिले पाहिजे. अमेरिकेच्या मिशिगन विश्वविद्यालयाचे सी.एस.मोट चिल्ड्रेन हॉस्पिटलचे प्रमुख लेखक जेनी रडेस्की यांनी म्हटले आहे की, सामान्य सुखाच्या निमित्ताने या उपकरणांचा वापर मुलांच्या भावना नियंत्रित करण्याच्या क्षमतेला मर्यादित करु शकतो. तसेच डिजीटल मीडिया कित्येक मुलांच्या बालपणाचा अनिवार्य हिस्सा बनला आहे, मात्र याने नक्कीच त्यांच्या विकासावर परिणाम होतो आहे. सुरुवातीचा बालपणाचा काळ हा वेगाने बुद्धीचा विकास होण्याचा काळ असतो. अशावेळी मुलांना खेळणे, झोपणे आणि आपल्या भावनांना सांभाळायला आणि संबंध बनविण्यासाठी वेळेची आवश्यकता असते. मीडियाचा जास्त वापर या क्रियांना थांबविते आणि याचा परिणाम मुलांच्या विकासावर होतो