शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

LMOTY 2026: डॉ. आरती किणीकर ठरल्या वैद्यकीय क्षेत्रातील 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 20:35 IST

Lokmat Maharashtrian of the Year awards 2026: जेनेटिक्स क्षेत्रात जगात प्रथमच निओनॅटल ट्रांसीएट डायबेटीस मेलिटस संदर्भात नवीन जेनेटिक म्युटेशन व्हेरिएन्ट शोधून काढण्याचे कार्य डॉ. किणीकर यांनी केले.

Lokmat Maharashtrian of the Year awards 2026: महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि चर्चेत असणारा बहुप्रतिक्षित लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर अवॉर्ड्स २०२६ हा सोहळा आज पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ज्येष्ठ अभिनेते आमिर खान, विकी कौशल यांसह राज्यभरातील मान्यवरांनी हजेरी लावली होती. यावेळी वैद्यकीय शासकीय - महाराष्ट्र या विभागातून डॉ. आरती किणीकर यांना भरीव योगदानासाठी व कामगिरीसाठी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

डॉ. आरती किणीकर या बालरोगचिकित्साशास्त्र विभागात उपअधिष्ठाता व प्राध्यापक व विभागप्रमुख आहेत. बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे येथेल त्या कार्यरत आहेत. मागील ४० वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्रातील विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत अध्यापन व संशोधन त्या करत आहेत. २०१७ साली ससून रुग्णालयात त्यांनी ५९ खाटांचे अत्याधुनिक लेव्हल ३ नवजात अतिदक्षता विभाग स्थापन केले. या विभागामार्फत दरवर्षी ३००० ते ४००० अतिगंभीर नवजात बालकांना जीवनदान दिले जाते.

डॉ. आरती किणीकर यांनी डीएम निओनॅटोलॉजी सुपरस्पेशालिटी अभ्यासक्रम सुरू करण्यात पुढाकार घेतला. २०१७ पासून नवजात शिशू काळजीसाठी राज्यस्तरीय प्रशिक्षण केंद्र सुरू करून हजारो नर्सेसना त्यांनी प्रशिक्षित केले. बीएलएस व पीएएलएस राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्र स्थापन करून ४०००–५००० नागरिकांना सीपीआर प्रशिक्षण दिले. “इंडिजिनियेस बबल सीपॅप ” व्हेंटिलेटर सर्किट हे पेटंट संशोधन करून व्हेंटिलेटरच्या कमतरतेच्या काळात त्यांनी हजारो बालकांचे प्राण वाचविले.

लहान मुलांमधील एच आय व्ही, टीबी, कोविड व क्लिनिकल जेनेटिक्स साठी “सेंटर ऑफ एक्सलेन्स”ची त्यांनी स्थापना केली. २०१० पासून गर्भावस्थेत थॅलेसेमिया निदान सुविधा ३०० पेक्षा अधिक मातांना त्याचा लाभ मिळाला. जेनेटिक्स क्षेत्रात जगात प्रथमच निओनॅटल ट्रांसीएट डायबेटीस मेलिटस संदर्भात नवीन जेनेटिक म्युटेशन व्हेरिएन्ट शोधून काढण्याचे कार्य त्यांनी केले. एचआयव्ही व टीबी संदर्भातील संशोधनामुळे डब्ल्यूएचओ मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बदल तसेच २०१३ पासून मातृदुग्धपेढी स्थापना त्यांनी केली. २०२४ पासून कंजेनायटल  हायपोथायरॉडिजम स्क्रीनिंग (सीएसआर अंतर्गत मोफत), ४००० बालकांची तपासणी; ५ बालकांचे लवकर निदान आणि २०० हून अधिक आंतरराष्ट्रीय शोधनिबंध असे त्यांचे भरीव योगदान आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Dr. Aarti Kinikar: Lokmat Maharashtrian of the Year in Medicine!

Web Summary : Dr. Aarti Kinikar was honored as Lokmat Maharashtrian of the Year 2026 for her significant contributions to medicine. She established a neonatal ICU, trained nurses, innovated ventilator solutions, and researched infant health, impacting countless lives through her dedication and expertise at BJ Government Medical College, Pune.
टॅग्स :lokmat maharashtrian of the year awardsलोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2026Lokmatलोकमत