#AskVT - Part 1Here we go! This is the 1st part of my first ever #AskVT live chat and interview. Here is the link to the second part: https://www.facebook.com/vaibhavtatwawadi/videos/1065421950188485/
Posted by Vaibbhav Tatwawdi on Sunday, March 20, 2016
चाहत्यांनी उलगडवला वैभवचा जीवनप्रवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2016 13:02 IST
एक लाइव्ह चाट व्हिडीओ आपला लाडका हॅण्डसम बॉय वैभव तत्ववादी याने केला आहे
चाहत्यांनी उलगडवला वैभवचा जीवनप्रवास
प्रत्येक कलाकारासाठी प्रेक्षक हे रसिक मायबाप असतात. चाहते आहेत म्हणून तर कलाकार आहे. मग चाहत्यांच्या प्रश्नांचे उत्तर देणे हा प्रत्येक कलाकाराचा आनंदच असतो. असाच एक लाइव्ह चाट व्हिडीओ आपला लाडका हॅण्डसम बॉय वैभव तत्ववादी याने केला आहे. वैभव याने आपल्या चाहत्यांच्या खूप दिवसांपासून सोशलमिडीयावर येऊन पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मोठया आनंदाने दिली आहेत. या व्हिडीओमध्ये चाहत्यांनी त्याला कॉलेजची धमाल, नागपूरच्या बालपणीच्या आठवणी, तुझा रोल मॉडेल, तुला मिळालेल्या पहिला ब्रेक, बाजीराव मस्तानीच्या आठवणी, बॉलीवुडच्या स्टार कलाकारांसोबत आलेले अनुभव असा त्याचा जीवनप्रवास चाहत्यांनी त्याच्याकडून उलगडवला आहे. याबाबत लोकमत सीएनएक्सशी बोलताना वैभव म्हणाला, हे लाइव्ह चाट व्हिडीओ पहिल्यादांच केला आहे. चाहत्यांचे हे प्रेम पाहून फार आनंद झाला आहे. यामध्ये मी दोन व्हिडीओ अपलोड केले आहेत. तसेच जर्मन, जपान, अमेरिका यांसारख्या देशातून चाहत्यांचे आलेले प्रश्न पाहून देखील खरंच खूप भारी वाटले.