कमी झोपेमुळे लागते आरोग्याची वाट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 05:41 PM2018-02-05T17:41:17+5:302018-02-05T17:42:16+5:30

आरोग्याच्या तक्रारींनी व्हाल बेजार!

Lack of sleep will lead to ill health | कमी झोपेमुळे लागते आरोग्याची वाट!

कमी झोपेमुळे लागते आरोग्याची वाट!

Next
ठळक मुद्देकमी झोपेमुळे तुमची चयापचय क्रिया बिघडते.आपल्या भुकेचेही तीनतेरा वाजतात. आणि आपल्या एनर्जीवरही कमी झोपेचा विपरित परिणाम होतो..

- मयूर पठाडे

तुम्ही रोज किती तास झोपता? आठ तासांपेक्षा जास्त की कमी?
हे विचारायचं कारण असं की यावरच तुमच्या आरोग्याच्या बºयाच गोष्टी अवलंबून असतात.
तुम्हाला वाटत असेल, कमी झोपेमुळे आपली जास्त कामं होतात, वेळेचा आपण सदुपयोग करतो.. पण खरंच तसं आहे?
अर्थात याबद्दलचे बरेच वाद-प्रवाद तुम्ही ऐकले असतील, काही वेळा तुम्ही स्वत: त्यात हिरीरीनं सहभागही घेतला असेल, पण नक्की किती वेळ झोपायचं हा प्रश्न उरतोच..
त्यापूर्वी याबद्दल नुकतंच झालेलं एक संशोधन काय सांगतं, ते आपण पाहू या.
हे संशोधन सांगतं, तुम्ही तुमच्या गरजेपेक्षा कमी झोपत असाल, तर तुमच्या आरोग्याच्या अनेक तक्रारी सुरू होऊ शकतात.
पहिली गोष्ट..
कमी झोपेमुळे तुमची चयापचय क्रिया बिघडते.
दुसरी गोष्ट..
तुमच्या भुकेचेही तीनतेरा वाजतात.
आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट..
तुमच्या एनर्जीवरही कमी झोपेचा विपरित परिणाम होतो..
आणि याचाच परिणाम म्हणून तुमचं वजनही भसाभसा वाढू लागतं. म्हणजे तुम्हाला कळत नाही, पण सातत्यानं थोडं थोडं तुमचं वजन वाढत जातं आणि आपला नगारा कसा, केव्हा झाला हेदेखील आपल्याला कळत नाही.
त्यामुळेच आपल्याला जे नेहेमी ऐकायला येतं, सांगितलं जातं की, तुमची रोजची झोप किमान सात ते आठ तास तरी असली पाहिजे, त्यात काहीच चुकीचं नाही.
पण झोपेचा आणि वजन वाढीचा नेमका संबंध तरी काय?
कसं वाढतं हे वजन?
त्याविषयी पाहू या पुढच्या भागात..

Web Title: Lack of sleep will lead to ill health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.