शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

​जाणून घ्या काय आहे अक्षय कुमारच्या फिटनेसचे रहस्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2017 15:21 IST

अक्षय कुमार आजही इतका फिट कसा आहे हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. त्याने त्याच्या फिटनेसचे रहस्य नुकतेच द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या कार्यक्रमात सांगितले आहे.

अक्षय कुमार हा आज बॉलिवूडमधील फिट अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. अक्षय आज पन्नास वर्षांचा असला तरी त्याचा फिटनेस खूपच चांगला आहे. त्याचे अॅक्शन सीन तरुण अभिनेत्यांना लाजवतील असे असतात. अक्षयचा हा फिटनेस पाहाता अक्षय त्याच्या फिटनेससाठी काय करतो हा सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे. अक्षयच्या फिटनेसचे रहस्य काय आहे याविषयी त्याने नुकतेच स्टार प्लस वरील द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या कार्यक्रमात सांगितले आहे. द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या कार्यक्रमात नुकतीच श्रेयस तळपदे आणि साजिद खान यांची एंट्री झाली आहे. या कार्यक्रमात अक्षय सोबतच श्रेयस आणि साजिद देखील परीक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहेत. या तिघांची खऱ्या आयुष्यातही खूप चांगली मैत्री असल्याने ती मैत्री छोट्या पडद्यावर देखील दिसून येत आहे. साजिदने दिग्दर्शित केलेल्या अनेक चित्रपटांमध्ये अक्षय आणि श्रेयसने एकत्र काम केले आहे. या कार्यक्रमातील स्पर्धकांचे कौतुक करण्यासोबतच ही मंडळी एकमेकांची टर खेचत असल्याचे देखील आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रेक्षकांना खळखळून हसण्याची संधी मिळत आहे.  अलीकडेच एका भागात परविंदरसिंग हा स्पर्धक आपल्या वाढीच्या वयात सरसों का तेलचे किती महत्त्व आहे, ते सांगत होता. आपल्याला सुदृढ राखण्यासाठी आपली आई सरसों का तेलचा कसा भरपूर वापर करत असे, ते देखील त्याने या कार्यक्रमात अतिशय विनोदी ढंगाने सांगितले. साध्या साध्या गोष्टीही विनोदी कशा करायच्या, याची कला परविंदरला चांगलीच अवगत आहे. त्याच्या या स्कीटवर उपस्थितांना हसू आवरत नव्हते.परविंदरच्या या वक्तव्याला दुजोरा देताना सुपरजज्ज अक्षय कुमार म्हणाला, “प्रत्येक पंजाबी कुटुंबात हेच घडत असतं, असं मला वाटतं. माझी आईही माझी हाडं मजबूत करून मला सुदृढ ठेवण्यासाठी या तेलाचा भरपूर वापर करत असे. माझ्या तंदुरुस्तीचं रहस्य कदाचित यातच दडलेलं आहे.द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या कार्यक्रमामुळे अक्षय कुमारच्या तगड्या आणि काटक शरीरयष्टीचे रहस्य आता सगळ्यांना कळाले आहे. Also Read : अक्षय कुमारने शेअर केला असिनच्या मुलीचा पहिला फोटो