शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पुढील आठवड्यापासून लसीकरण; जाणून घ्या, लॅबपासून जवळच्या आरोग्य केंद्रापर्यंत कशी पोहोचणार कोरोना लस?

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: January 5, 2021 19:52 IST

यासंदर्भात बोलताना आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले, कोरोना लशीला मंजुरी मिळाल्यानंतर, 10 दिवसांनंतर लसिकरण कार्यक्रमाला सुरुवात होऊ शकते.

ठळक मुद्देआता लसीकरणाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. कोरोना लशीला मंजुरी मिळाल्यानंतर, 10 दिवसांनंतर लसिकरण कार्यक्रमाला सुरुवात होऊ शकते. देशात करनाल, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई येथे 4 प्राथमिक व्हॅक्सीन स्टोर्स आहेत.

नवी दिल्ल - देशात कोरोनाविरोधातील लढाईत दोन कोरोना लशींना मंजुरी मिळाल्यानंतर, आता लसीकरणाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. देशात पुढील आठवड्यापासून लसिकरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात होऊ शकते, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. आता सर्वात मोठा प्रश्न असा, की ही लस लॅबमधून जवळच्या लसिकरण केंद्रापर्यंत कशी पोहोचेल?

यासंदर्भात बोलताना आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले, कोरोना लशीला मंजुरी मिळाल्यानंतर, 10 दिवसांनंतर लसिकरण कार्यक्रमाला सुरुवात होऊ शकते.  कोरोना लशीच्या इमरजन्सी वापरासंदर्भात DCGIने 3 जानेवारीला (रविवार) आपली मंजुरी दिली होती. यानुसार, 13 अथवा 14 जानेवारीपासून देशात कोरोना लसिकरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात होऊ शकते. 

लोकांपर्यंत कशी पोहोचेल लस? -लस लोकांपर्यंत कशी पोहोचेल? यावर आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी सांगितले, की लस कॅरियरच्या माध्यमाने कोल्ड चेन प्वाइंट्सने सर्व सेंटर्सपर्यंत (हे जिल्हा रुग्णालय, आरोग्य केंद्र, कम्यूनिटी सेंटर्स असू शकतात.) एक रेफ्रिजिरेटर अथवा इंस्युलेटेड व्हॅनच्या (पॅसिव्ह इक्विपमेन्ट, आईस बॉक्स अथवा टेम्परेचर कंट्रोल्ड आदि) माध्यमाने नियोजित स्थळी पाठवली जाईल.

देशात 4 प्राथमिक व्हॅक्सीन स्टोर्स आहेत -राजेश भूषण म्हणाले, देशात करनाल, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई येथे 4 प्राथमिक व्हॅक्सीन स्टोर्स आहेत. लॅबमधून लशी GMSD डेपोने या चारही स्टोर्सपर्यंत हवाई मार्गाने पाठवल्या जातील. यानंतर देशातील 37 लस केंद्र आहेत आणि येथेच लशी स्टोअर केल्या जातील. यानंतर, लशी बल्कमध्ये जिल्हा स्तरावर पाठवल्या जातील.

आजच्या घडीला देशात जवळपास 29,000 कोल्ड चेन प्वाइंट्स -जिल्हा स्तरावरून या लशी प्राथमिक आरोग्य केंद्रांपर्यंत फ्रिजर डब्ब्यांच्या सहाय्याने पाठवल्या जातील. येथे ही लस लोकांना टोचली जाईल. तसेच, आजच्या घडीला देशात जवळपास 29,000 कोल्ड चेन प्वाइंट्स आहेत. येथे या लशी सुरक्षितपणे स्टोर करून ठेवल्या जाऊ शकतात, असेही आरोग्य सचिव भूषण यांनी सांगितले. 

रुग्ण संख्येत घट -देशात कोरोनाला आळा घालण्यात यश येत असल्याचेही राजेश भूषण यांनी सांगितले. गेल्या 11 दिवसांत दर दिवसाला 300 हून कमी मृत्यू होत आहेत. देशात कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट केवळ 1.97 टक्के इतका असून एकूण पॉझिटीव्ह रुग्णांपैकी 43.96 टक्के रुग्णांवर रुग्णालय अथवा कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. तर 56.04 टक्के रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या