शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
2
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
3
पत्नीसोबत Post Office च्या स्कीममध्ये करा गुंतवणूक; दर महिन्याला मिळेल ₹९००० चं फिक्स व्याज
4
अल कायदाच्या दहशतवाद्यांनी केलं तीन भारतीयांचं अपहरण, या देशात घडली धक्कादायक घटना
5
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
6
बेपर्वाईने गाडी चालवणे आत्ताच थांबवा, मृत्यू झाल्यास नातेवाईकांना इन्शुरन्सचा एकही रुपया मिळणार नाही!
7
स्विमिंगपूलमध्ये पोहून घरी परतताना भीषण अपघात, चार मुलांसह पाच जण ठार!
8
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
9
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
10
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
11
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
12
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
13
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
14
त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप
15
लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा
16
काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
17
गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
18
कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
19
पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई
20
परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती

​जॉनी लिव्हरच्या मुलाला होता 'हा' गंभीर आजार !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2017 11:15 IST

या आजारातून बाहेर पडण्यासाठी जेसे लिव्हरला शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर १२ वीनंतर शिक्षण सोडावे लागले.

बॉलिवूडचा कॉमेडियन जॉनी लिव्हरला आपण ओळखतोच. कोणत्याही चित्रपटात जॉनीने आपल्या दर्शकांना हसवून लोटपोट केले आहे. जॉनीने आपल्या अभिनयातून चित्रपटसृष्टीत ठसा उमटविला असून त्याचा मुलगा जेसे लिव्हरदेखील बॉलिवूडमध्ये डेब्यूच्या तयारीत आहे. जेसे आता २७ वर्षाचा झाला असून त्याला चित्रपटाच्या आॅफर यायला सुरुवात झाली आहे. मात्र तो चांगल्या भूमिकेची वाट पाहत आहे. जोपर्यंत चांगला रोल मिळत नाही, तोपर्यंत चित्रपटसृष्टीपासून लांबच राहणार आहे, असे जेसेचे म्हणणे आहे. जेसेला लहाणपणीच एका गंभीर आजाराचे लक्षणे जाणवायला लागले होते. वयाच्या १२ व्या वर्षी जेसेला गळ्यात ट्यूमर झाला होता. हा ट्युमर एवढा वाढला की त्याने कँसरचे रूप घेतले. अनेक वर्षे परदेशांत उपचारानंतर कँसरशी सामना करत जेसे ठीक झाला.  विशेष म्हणजे या आजारातून बाहेर पडण्यासाठी जेसेला शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर १२ वीनंतर शिक्षण सोडावे लागले. बहिणीचे करिअर पाहून आणि वडिलांनी समजावल्यानंतर त्याने पुन्हा शिक्षण सुरू केले आणि लंडनमध्ये ह्युमन रिसोर्सेसमध्ये पदवी घेतली. जेसेने वडिलांप्रमाणे कॉमेडीत प्रयत्न केले नाही. सुरुवातीपासून तो म्युझिकवर लक्ष देत आहे. जेसे उत्कृष्ट म्युझिशियन असून तो ड्रम वाजवतो. जेसेचा एक म्युझिकल ग्रुपही आहे. त्यांच्याबरोबर जेसेने अनेक शो केले आहेत. त्याच्यासाठी कॉमेडी नव्हे तर म्युझिक हे करिअर आहे.जेसेने करिअरबरोबरच फिटनेसकडेही विशेष लक्ष दिले आहे. जेसे नेहमी त्याच्या ६ पॅक अ‍ॅब्समुळे  सोशल मीडियात चर्चेत राहतो. सोशल मीडियावर तो नेहमी अ‍ॅब्स फ्लॉन्ट करत फोटो पोस्ट करत असतो. जेसे उत्कृष्ट मिमिक्री आर्टिस्टही आहे. त्याला वडिलांकडून हा वारसा मिळाला आहे. त्याने स्टँडअप कॉमेडियन म्हणून अनेक शो केले पण यश मिळाले नाही. पण इमोशनल रोल्समध्ये त्याला पुरस्कार मिळाले. त्यामुळे त्याने कॉमेडी सोडून अ‍ॅक्टींगकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे.  Also Read : ​​सबसे बडा कलाकारमध्ये जॉनी लिव्हर आणि मुलगी जॅमी लिव्हर यांची जुगलबंदी