जयललिता कृत्रिम श्वासोच्छवासावर चेन्नई : तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना कृत्रिम श्वासोच्छवास देण्यात आल्याचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे. येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे हॉस्पिटलच्या वतीने सांगण्यात आले आहे. संसर्गावर उपचार करण्यासाठी अँटिबायोटिक्स औषधी आणि कृत्रिम श्वासोच्छवास देण्यात आला आहे. डॉक्टरांचे एक पथक त्यांच्यावर उपचार करीत असून, त्या उपचाराला चांगला प्रतिसाद देत असल्याचे हॉस्पिटलने म्हटले आहे. २२ सप्टेंबर रोजी जयललिता यांना उपचारासाठी अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. ..........
जयललिता कृत्रिम श्वासोच्छवासावर
By admin | Updated: October 4, 2016 00:48 IST