१५ आॅगस्ट दाखविणार आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2016 06:03 IST
अनिलकुमार साळवे दिग्दर्शित १५आॅगस्ट हा लघुचित्रपट अमेरिकेतील लॉस एंजलिस येथे होणाºया आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवात दाखवला जाणार आहे.
१५ आॅगस्ट दाखविणार आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवात
राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी लघुपट,चित्रपट आपली मोहर उमठवत असताना आता, अनिलकुमार साळवे दिग्दर्शित १५आॅगस्ट हा लघुचित्रपट अमेरिकेतील लॉस एंजलिस येथे होणाºया आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवात दाखवला जाणार आहे. या विषयी दिग्दर्शक अनिलकुमार साळवे यांनी लोकमत सीएनएकसशी संवाद साधला असता ते म्हणाले, लघुपटाची कथा ही एका गरीब कुटुंबातील किशोरवयीन मुला भोवती फिरते. प्रत्येक नागरीक देशाच्या स्वातंत्र्य दिनात आपला सहभाग नोंदवतो. पंरतु काहींना मात्र यासाठी संर्घष करावा लागतो.असाच काहीसा प्रसंग लघुपटातील मुलाबाबत घडतो. आतापर्यंत सात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चित्रपट समीक्षक,प्रेक्षकांकडुन वाहव्वा मिळवणाºया या लघुपटात प्रमुख भुमिकेत राहुल कांबळे,शिवकांता सुतार,प्रदीप शिरवाडकर,सद्दाम शेख या कलाकारांचा समावेश आहे.