INTERESTING : झोपण्याच्या पद्धतीवरुन समजते, पती-पत्नींमध्ये किती प्रेम आहे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2017 14:59 IST
आपली झोपण्याची पद्धत आपल्या नात्याबाबतीत बरेच काही सांगते. चला जाणून घेऊया की, स्लीपिंग पोजिशन आपल्या प्रेमाच्या संबंधाबाबत काय सांगते ते.
INTERESTING : झोपण्याच्या पद्धतीवरुन समजते, पती-पत्नींमध्ये किती प्रेम आहे?
-Ravindra Moreज्याप्रमाणे आपल्या बॉडी लॅँग्वेजवरुन आपले वैशिष्टे समजतात, त्याचप्रमाणे आपल्या पार्टनरसोबत आपली झोपण्याची पद्धत आपल्या नात्याबाबतीत बरेच काही सांगते. चला जाणून घेऊया की, स्लीपिंग पोजिशन आपल्या प्रेमाच्या संबंधाबाबत काय सांगते ते. रोमॅँटिकया पोजिशनच्या कपलमध्ये पुरुष आपल्या महिला पार्टनरला प्रोटेक्ट करणे आणि खूप प्रेम देण्याची मनात इच्छा बाळगतात आणि महिला पार्टनरदेखील याला आनंदाने स्वीकार करतात. स्पून पोजिशनयात कपल चमचाच्या आकारासारख्या पोजिशन घेऊन झोपतात. या स्टाइलमध्ये एकतर पुरुष महिलेला कव्हर करतो नाहीतर महिला पुरुषाला. अशा पोजिशनमध्ये झोपणे म्हणजे एकमेकांसाठी प्रोटेक्टिवनेस दर्शविते. शिवाय ही इंटिमेट पोजिशन आपल्या दोघांमध्ये पॅशेनट लव, केयर आणि एकमेकांमधील जवळीकता दर्शविते. बॅक टू बॅक टचजर कपल एकमेकांकडे पाठ करुन झोपत असतील तर ही पोजिशन पाहून वाटेल की, दोघांमध्ये प्रेमापेक्षा तिरस्कारच जास्त आहे, मात्र असे मुळीच नाही. जर दोघे आपसात फिजिकल कॉन्टॅक्ट बनवून ठेवत असतील तर असे समजते की, दोघांना स्पेस हवाय मात्र एकमेकांच्या संपर्कात राहून. सिंगल टचया प्रकारच्या पोजिशनमध्ये झोपणारे कपल आपआपल्या स्वातंत्र्यावरुन प्रतिबद्ध आहेत. आपले विचार, लाइफ व्यूज आणि आपआपली प्राथमिकता दोघे एकमेकांना शेअर करु इच्छित नाही. बॅक टू बॅक क्लिफहेंगरजर कपल एकमेकांकडे पाठ करुन झोपत असतील आणि दोघांमध्ये कुठलाच फिजिकल कॉन्टॅक्ट नसेल तर याचे कित्येक प्रकार असू शकतात. सकारात्मक विचार केला तर, आपण एकमेकांपासून एवढे सुरक्षित आणि कम्फर्टेबल आहेत की, एकमेकांशी जुडून राहण्यासाठी कोणत्याही फि जिकली कॉन्टॅक्टची गरज नाही. मात्र दुसरा विचार केला तर असेदेखील असू शकते की, आपल्या दोघांमध्ये दुरावा निर्माण होत आहे.