INTERESTING : पार्टनर देत असेल ‘हे’ पाच संकेत, तर समजा तिला हवाय ‘सेक्स’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2017 14:35 IST
आपण हे पाच संकेत ओळखू शकत नसाल तर तुमच्यासोबत ती देखिल परमोच्च सुखापासून वंचित राहील...
INTERESTING : पार्टनर देत असेल ‘हे’ पाच संकेत, तर समजा तिला हवाय ‘सेक्स’!
-Ravindra Moreविशेषत: महिला आपल्या भावना व्यक्त करताना संकोच करतात. जर शारीरिक संबंधाची गोेष्ट असेल तर याबाबतीत तर ती अजून जास्त लाजते. स्पष्ट बोलण्यापेक्षा ती काही संकेतांद्वारे आपल्या भावना व्यक्त करीत असते. यासाठी एक चांगल्या पार्टनरच्या नात्याने आपणास त्या संकेतांना समजायला हवे. आज आम्ही आपणास असे काही संकेतांच्या बाबतीत सांगत आहोत की, त्याद्वारे आपला पार्टनर सेक्स करण्याच्या मूड मध्ये आहे, हे आपणास समजेल. * वेगाचे श्वास घेणे जेव्हा शरीरात उत्तेजना निर्माण होते तेव्हा श्वास जोराने आणि वेगाने घेण्यास सुरूवात होते. जेव्हा अत्युच्च सुख मिळविण्याची इच्छा निर्माण होते तेव्हा ह्रदयाचे ठोके जोरजोराने वाजू लागतात, यासाठी आतील भागांना अधिक आॅक्सिजनची गरज भासते. यामुळे श्वासाची क्रिया वेगवान होते. जेव्हा पार्टनरच्या बाबतीतही असे घडत असेल तर समजावे की ती बेडरूमकडे जाण्याचा संकेत देत आहे. * खांद्याचा इशारा जेव्हा पार्टनर आपल्याला अलिंगन करण्याऐवजी तिचे खांदे आपल्या शरीराजवळ आणत असेल तर समजावे की, तिच्या मनात काहीतरी सुरू आहे. जर महिलांचा एक हात तिच्या डोक्यावर, दुसरा हात तुमच्या डोक्यावर किंवा तुमच्या छातीवर असेल समजावे की, तिला तुमची सोबत परफेक्ट वाटत आहे आणि ती स्वत:ला थांबवू शकत नाही. * तुमच्या सोबतचा एकांत आवडणेजर तुमची पार्टनर तिच्या मित्रांपासून अलिप्त राहून तुमच्या सोबत तुमच्या घरी किंवा बेडरु ममध्ये जास्त वेळ थांबणे पसंत करीत असेल तर समजावे की, ती तुमच्याशी एकरुप होऊ इच्छिते. अशावेळी तिला नाराज कदापी करु नये. * ताळमेळ बसविणेजर आपण पार्टनरला प्र्रेमाने स्पर्श करीत असाल आणि त्यावेळी पार्टनरने पुढाकार घेत आपणास तिने किस केला आणि पुढे चालून पुन्हा जोरजोराने ती जर किस करीत असेल तर समजावे की, ती पूर्ण मूडमध्ये आहे. * अलिंगन देणे शरीरात उत्तेजना निर्माण झाल्यानंतर पार्टनरच्या प्रति आकर्षण वाढते. जर पार्टनर आपणास आपल्या कवेत सामावून घेत असेल किंवा घट्ट अलिंगन देत असेल तर समजावे की ती खूप रोमॅण्टिक मूड मध्ये आहे.