शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

इनडोअर सायकल.. व्यायाम आणि आरोग्यासाठी उत्तम पर्याय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 16:10 IST

महिला, पुरुष, मुलं.. सगळ्यांसाठी एक हटके प्रकार..

ठळक मुद्देगुडघेदुखी असलेलेही सायकलिंग करू शकतात,अनेकांना, त्यातही महिलांना सायकल चालवण्याचा कंटाळा येतो आणि लाजही वाटते. त्यांच्यासाठी इनडोअर सायकल अतिशय उपयुक्त.कोणत्याही वयोगटातील कोणीही ही सायकल चालवू शकतं. हळूहळू सुरुवात करून त्याचा वेळ आणि तीव्रताही आपण वाढवू शकतो.

- मयूर पठाडेतुम्ही व्यायाम करता? करतही असाल. आजकाल अनेक जण हौशीनं व्यायामाला जातात. त्याचे फायदे सगळ्यांनाच माहीत आहेत. कोणी रनिंगला जातं कोणी जिममध्ये जाऊन घाम गाळायला लागतं. पण काही काळ व्यायाम केल्यानंतर, विशेषत: रनिंग केल्यानंतर अनेकांना गुडघेदुखीचा त्रास सुरू होतो. कारण व्यायाम सुरू करायचा म्हटल्यावर बहुतेक सगळेजण अगोदर रनिंग किंवा जॉगिंगपासून, सकाळी ग्राऊंडवर फिरायला जाण्यापासून सुरुवात करतात. त्याचाही फायदा होतोच, नाही असं नाही, पण आपण कुठे चालतो, कसं चालतो, पायात कोणते शुज आहेत, या साºया गोष्टींवर तुमची गुडघेदुखी अवलंबून असते. त्यामुळे तज्ञांचा सल्ला असतो, त्यापेक्षा तुम्ही सायकलिंग करा.गुडघेदुखी असलेलेही सायकलिंग करू शकतात, पण अनेकांना, त्यातही महिलांना सायकल चालवण्याचा कंटाळा येतो आणि लाजही वाटते. या वयात कुठे सायकल चालवायची म्हणून तो विचारच ते सोडून देतात. त्यामुळे अशा अनेक लोकांसाठी इनडोअर सायकल, म्हणजे व्यायामाची घरात एका जागी ठेऊन ज्यावर व्यायाम करता येतो अशी सायकल अतिशय उपयुक्त. ही सायकलही विकत घेण्याची गरज नसते. आजकाल बºयाच जिममध्ये अशा सायकली असतात. तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ही सायकल तुम्ही चालवू शकता.कोणत्याही वयोगटातील कोणीही ही सायकल चालवू शकता. हळूहळू सुरुवात करून त्याचा वेळ आणि तीव्रताही आपण वाढवू शकतो. त्याचे अनेक फायदे आहेत आणि मुख्य म्हणजे कोणत्याही काळात तुम्ही सहजपणे ती चालवू शकता. उन्हाळा, हिवाळा, उन्हाळा, अगदी काहीही!रस्त्यावर चालवण्याच्या सायकलींना तरी काही प्रमाणात मर्यादा पडतात, पण या सायकलिंगला नाही..त्यामुळे करा सुरुवात सायकलिंगला आजपासूनच.या सायकलिंगचे काय फायदे आहेत ते पाहूया पुढच्या भागात..