शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

हायपोथायरायडिझमचे प्रमाण वाढतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 15:10 IST

रक्तदाब, मधुमेह याबरोबरच आता थायरॉईड रूग्णांचे प्रमाण वाढत आहे. पुरूषांपेक्षा महिलांमधील हार्मोन्स झपाट्याने बदलत असल्यामुळे थायरॉईड विकाराचे प्रमाण महिलांमध्ये अधिक आहे.

मेहरून नाकाडे 

रत्नागिरी : रक्तदाब, मधुमेह याबरोबरच आता थायरॉईड रूग्णांचे प्रमाण वाढत आहे. पुरूषांपेक्षा महिलांमधील हार्मोन्स झपाट्याने बदलत असल्यामुळे थायरॉईड विकाराचे प्रमाण महिलांमध्ये अधिक आहे. थायरॉईड ही एक लहान ग्रंथी असून, तिचा आकार फुलपाखरासारखा असतो. 

गळ्याच्या खालच्या भागात मध्यभागी ही ग्रंथी असते. शरीराच्या चयापचयाचा वेग नियंत्रित ठेवणे, त्यासाठी थायराईड संप्रेरकांची निर्मिती करणे, हे या ग्रंथीचे मुख्य कार्य आहे. हायपोथायराईडीझम या आजारात या संप्रेरकांची निर्मिती कमी होत असल्यामुळे चयापचयाचा वेग मंदावतोे. हा आजार काही रूग्णांना आयुष्यभर सहन करावा लागतो.  काही कुटुंबांमध्ये अनुवांशिकरित्या थायरॉईडचा आजार होतो. कुटुंबातील एका व्यक्तिला थायरॉईडचा त्रास झाल्यास अनुवांशिकरित्या पुढील पिढीमध्ये जातो. त्यामुळे थायरॉईडचा त्रास असणाºयांनी किमान सहा महिने, वर्षातून एकदा तरी वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक आहे. या आजारात इम्यू सेल्स शरीरातील सेल्सवर हल्ला करतात. यामुळे टाईप १ मधुमेहसारख्या आॅटो इम्यू आजारात थायरॉईड चाचणी करणे आवश्यक आहे. अति ताणतणाव थायरॉईडसाठी कारणीभूत आहे. जितका ताण अधिक तितका हार्मोन्सच्या पातळीमध्ये चढउतार तीव्र होतो. ताण न घेता व नियमित योगासने, व्यायामाव्दारे थायरॉईडवर नियंत्रण ठेवता येते, असे तज्ज्ञांचे मत आहे. वाढते वय हे देखील एक कारण आहे. वय वाढते तशी शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. 

थायरॉईडची कारणे, चाचण्या व उपचार

शरीराची प्रतिकारशक्ती आपल्याच थायराईड ग्रंथींच्या विरूध्द कार्य करून थायराईड ग्रंथीला नष्ट करते. हे या रोगाचे सर्वांत जास्त आढळून येणारे कारण आहे. काही आजारांमध्ये थायरॉईडची शस्त्रक्रिया करून ती ग्रंथी पूर्णपणे काढण्यात येते. किरणोत्सराचा उपचार, विषाणंूचा परिणाम, जन्मत:च ग्रंथी नसणे, अशीसुध्दा कारणे आहेत. आयोडिनच्या कमतरतेमुळे किंवा अधिक सेवनामुळेही हा आजार होतो. मात्र, हे कारण फार कमी आहे. हायपोथायराईडीसमचे निदान करण्यासाठी टी ३, टी ४ टी एसएच या तपासण्या करणे आवश्यक आहे. 

तणावपूर्ण जीवनशैली कारण

थायरॉईड हा प्रामुख्याने महिलांमध्ये होणारा आजार आहे. पुरूषांपेक्षा महिलामंध्ये हार्मोन्स बदल अधिक होतात. नैसर्गिकरित्या होणाºया या बदलाचे प्रमाण अधिक आहे. महिलांच्या वयोमानानुसार प्रत्येक टप्प्यात बदल होत असतात. मासिक पाळी सुरू होणे, गर्भधारणा, बाळंतपण, मासिक पाळी बंद होणे, यावेळी हार्मोन्स बदल झपाट्याने होतात. तणावपूर्ण जीवनशैली हे थायरॉईड विकाराचे मुख्य कारण आहे. सुरूवातीच्या टप्प्यात नियमित औषधोपचाराने नियंत्रण मिळविता येते. 

लक्षणे

दैनंदिन कामामध्ये निरूत्साह जाणवणे, कमालीचा थकवा वाटणे, मलाविरोध होणे, अचानक वजन वाढणे, अनियमित मासिक पाळी, चेहऱ्यावरील केसांची लव अतिप्रमाणात दिसू लागणे, घशाला सूज येणे अशी लक्षणे दिसू लागतातच थायरॉईडची शक्यता असते. थकवा व अशक्तपणा जाणवत असतानाच हातापायांना व चेहऱ्याला सूज येणे थायरॉईड ग्रंथीला सूज येणे (गॉयटर) वजन वाढणे, संधीवात होणे, हातापायांना मुंग्या येणे किंवा बधीरपणा येणे. वंध्यत्व येणे. विसराळूपणा वाढणे, मानसिक ताणतणाव वाढणे, केस जास्त गळणे, केस रूक्ष व रखरखीत  होणे या तक्रारीने रूग्ण त्रस्त होतात. 

आयोडिन सेवन

आवश्यकतेपेक्षा जास्त किंवा कमी आयोडिन आहारात घेणे, हेदेखील थायरॉईडचे कारण आहे.  शरीराला रोज १५० मायक्रोग्रॅम आयोडिनची आवश्यकता असते. यामुळे जास्त किंवा कमी सेवनामुळे देखील हा त्रास होऊ शकतो.