दम्याच्या रुग्णांमध्ये वाढ
By admin | Updated: August 2, 2015 22:55 IST
प्रदूषाणाचा परिणाम : कबुतरांची पिसे, विष्ठाही ठरत आहे घातक
दम्याच्या रुग्णांमध्ये वाढ
प्रदूषाणाचा परिणाम : कबुतरांची पिसे, विष्ठाही ठरत आहे घातक....प्राची सोनवणे, नवी मुंबई : प्रदूषण, हवामानातील बदल, बदलती शीवनशैली यामुळे शहरी भागांत श्वसनाच्या आजारांत वाढ झाली आहे. लहान मुलांमध्ये दम्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली. नवी मुंबईत ५ ते १२ वर्षे वयोगटातील ८ टक्के मुलांना श्वसनाचे आजार झाले असून तरुणांमध्ये हेच प्रमाण १३ टक्के आहे. वोकहार्ड्ट रुग्णालयाने केलेल्या सर्वेक्षणातून ही आकडेवारी पुढे आली आहे. नवी मुंबईसारख्या वेगाने विकसित होणार्या शहरात तरुणांमध्ये फुफ्फुस आणि श्वसनाच्या विकारांचे प्रमाण वाढले आहे. बेलापूर, खारघर, मानसरोवर, नेरुळ, तुर्भे येथील कबुतरांची वाढलेली संख्याही श्वसनविकारांस कारण ठरत आहे. त्यांच्या पंखांमधील विषाणू आणि विष्ठेतील कवक आरोग्यास धोकादायक ठरत आहेत. जंतूसंर्ग होऊन श्वसनाच्या आजारांचे प्रमाण वाढत आहे. शहरातील दमा पीडितांच्या संख्येत ४० टक्के वाढ झाल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. दमा, दिर्घकालीन दमा, श्वसनविकार या दुर्धर आजार यांचे शहरातील प्रमाण वाढले असून -हदयविकार व मधुमेह अशा जीवघेण्या आजारांच्या यादीत या आजारांचा समावेश झाल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. ...दम्याचे रुग्ण नवी मुंबई : ३ लाखाहून अधिकमुंबई : १० लाख...हल्ली सर्वच घरांमध्ये सोफासेट, कारपेट, पडदे असतात. ते रोजच्या रोज धुणे शक्यच नसते. त्यामुळे धुलीकण यामध्ये साठून राहतात आणि दम्याच्या विषाणूंसाठी हे वातावरण पोषक ठरते. पाळीव प्राणी आणि कबुतरांमुळे जुंतूसर्ग होऊन लहान मुलांमध्ये दम्याच्याचे प्रमाण वाढत आहे. नवी मुंबई शहरातील खारघर आणि नेरुळ परिसरात कबुतरांची संख्या मोठी आहे. त्यामुळे अनेकांना संसर्ग होत आहे. - डॉ. अभय उपे .........कबुतरांमुळे वाढले अजारकबुतरांची वाढती संख्या अस्थमाला कारणीभूत असल्याचे केईएम रुग्णालयातील औषध व पर्यावरण संशोधन केंद्राने नोव्हेंबर २०१४ मध्ये केलेल्या प्रयोगातून स्पष्ट झाले आहे. कबुतरांची पिसे आणि विष्ठेतील विषाणुंमळे म्हणजेच पिजन ड्रॉपिंग्समुळे श्वसनाचे आजार होतात. त्यांच्यामुळे पसरणार्या विषाणुंमुळे फुफ्फुसाचे आजार, ॲलर्जी, हायपरसेन्सेटिव्हीटी, न्युमोनियाटीस, अस्थमा, ॲलर्जीक सर्दी आणि आणि सिाकोसिस असे आजार होतात. ....