शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

तुमचा जोडीदार ‘घोरी’ असेल तर..? काय उपाय कराल..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 05:15 IST

आपल्या जोडीदाराच्या किंवा घरात कोणी घोरत असेल तर त्याच्या घोरण्याचा आपल्यावर फारसा परिणाम होऊ द्यायचा नसेल, तर काय करायचं?

झोपेचा आणि आरोग्याचा अतिशय जवळचा संबंध आहे. त्यातही आपला जोडीदार जर घोरत असेल तर त्या घोरण्यानंही तुमच्या झोपेचे बारा वाजतात आणि अर्थातच तुमच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होताे. पण आपल्या जोडीदाराच्या किंवा घरात कोणी घोरत असेल तर त्याच्या घोरण्याचा आपल्यावर फारसा परिणाम होऊ द्यायचा नसेल, तर काय करायचं?१- घोरण्याच्या आवाजाकडे आणि सतत बदलणाऱ्या त्यातील ‘आरोह-अवरोहां’कडे आपलं लक्ष जाणार नाही, हे अशक्यच. त्यामुळे आपल्याला अतिशय अस्वस्थ होतं, चीडचीड होते, पण घोरण्याच्या आवाजावर लक्ष केंद्रित न करण्यासाठी तुम्ही स्वतःला प्रशिक्षित करू शकता. त्यामुळे तुम्हाला त्याचा फारसा त्रास होणार नाही. झोप लागेपर्यंत तरी तुम्ही ही ‘युक्ती’ वापरू शकता.२- आणखी एक ‘स्वस्त’ आणि सोपा उपाय म्हणजे रात्रीच्या वेळी ‘करवतीने लाकूड कापल्याच्या आवाजानं’ आपण त्रस्त झाला असाल, तर सरळ कानात इअर प्लग घाला. त्यामुळे तुमच्या कानाजवळची ‘खरखर’ बंद होईल. कानात इअर प्लग घालायला आवडत नसेल तर ज्या ठिकाणी खूप गोंगाट असतो, अशा ठिकाणी बाहेरचा आवाज बंद करण्यासाठी अनेक जण हेडफोन वापरतात. त्याचाही वापर करता येईल.३- रात्री झोपताना मंद संगीत ऐका किंवा व्हाईट नॉइज मशीनचा उपयोग करा. हे यंत्र सुसंगत आवाज निर्माण करतं, जे सुखदायी वाटतं. यासाठी पैसे खर्च करायचे नसतील तर सरळ आपल्या स्मार्टफोनवर ते किंवा मेडिटेशन ॲप डाऊनलोड करा.४- पाठीवर झोपल्यावर बऱ्याचदा घोरण्याचं प्रमाण वाढतं. त्यामुळे तुमचा पार्टनर घोरत असेल तर त्याची झोपेची पोझिशन बदला. बाजारात ‘हेड पोझिशनिंग पिलो’ किंवा ‘स्नोअर रिड्युसिंग ट्रेनर’सारख्या गोष्टी मिळतात. ज्यामुळे पार्टनरला पाठीवर झोपणं अवघड होतं आणि त्याचं घोरणंही थांबतं.५- पुरुष जसं घोरतात, तसं स्त्रियाही घोरतात, पण त्यांच्या घोरण्याविषयी फारसं बोललं जात नाही. ‘घोरणं नैसर्गिक आहे’, असं समजून सोडून देऊ नका. ‘घोरु नकोस’ असं जोडीदाराच्या सतत कानीकपाळी ओरडत राहिलं तरी त्याचं घोरणं कमी होणार नाही किंवा थांबणार नाही. त्याऐवजी आपल्या जोडीदाराला ‘स्लिप क्लिनिक’मध्ये घेऊन जा. त्यामुळे घोरण्याचं नेमकं कारण कळेल आणि त्यानुसार उपाययोजनाही करता येतील.