शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

आज मला फ्रेश वाटतंय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 17:13 IST

का? टेन्शन असं अचानक गायब कसं काय झालं?

ठळक मुद्देतुम्ही कुणीही असा, ठराविक वेळानं ब्रेक घेत जा.अगदी पाच-दहा मिनिटाचा हा ब्रेकही तुम्हाला ताजतवाणं, स्फुर्तीलं करील.हा ब्रेक मात्र शक्य तेवढा एन्जॉय कसा करता येईल याकडे आवर्जुन लक्ष द्या आणि आपलं झोपेचं शेड्यूलही जरा मार्गी लावा..

- मयूर पठाडेटेन्शन कुणाला चुकलंय? लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच कुठल्या ना कुठल्या प्रकारचं टेन्शन असतंच. अनेकदा ते समोरच्याला कळत नाही इतकंच. बºयाचदा तर ते आपल्या स्वत:लाही कळत नाही.अचानक एखाद-दिवशी काहीतरी होतं, छातीत दुखायला लागतं, दम लागायला लागतो, काहींना ब्लड प्रेशरचा, तर काहींना हृदयाचा त्रास सुरू असतो. अगदी कुठल्याही कारणानं आपण डॉक्टरकडे गेलो, तरी बºयाचदा आपल्याला पहिला प्रश्न विचारतात, तो म्हणजे तुम्हाला कसलं टेन्शन आहे का? अजिबात टेन्शन घेऊ नका..हे सांगणं खरंच सोपं आहे, पण करणं? तेही फारसं अवघड नाही.पण ‘तुम्हाला कसलं टेन्शन आहे का? अजिबात टेन्शन घेऊ नका’ असं डॉक्टरांनी विचारल्यावर मग आपण विचार करायला लागतो, खरंच आपल्याला टेन्शन आहे का?.. एक एक गोष्टी मग आठवायला लागतात, हो, याचं टेन्शन आहे, त्याचं थोडं टेन्शन आहे.. यादी हळूहळू मग वाढायला लागते. काही वेळा तर या विचारांनीच टेन्शन यायला लागतं की आपल्याला किती टेन्शन आहे!पण यावर काही सोप्पे उपाय आहेत. एक म्हणजे तुम्ह्ी कोणीही असा, विद्यार्थी असा, नोकरदार किंवा स्वयंरोजगार करणारे. आपल्या कामातून दर ठराविक वेळानं ब्रेक घेत जा. अगदी पाच-दहा मिनिटाचा हा ब्रेकही तुम्हाला ताजतवाणं, स्फुर्तीलं करील. हा ब्रेक शक्य तेवढा एन्जॉय कसा करता येईल याकडेही आवर्जुन लक्ष द्या. हा ब्रेक तुम्ही जेवढा एन्जॉय कराल, तेवढं तुमच्या मोनोटोनस कंटाळवाण्या कामापासून तुम्ही थोडा वेळ तरी दूर जाल. हा ब्रेकच आपल्याला नवी ऊर्जा देऊन जातो.दुसरी गोष्ट म्हणजे बºयाचदा आपलं आपल्या झोपेकडे लक्ष नसतं. पुरेशी झोप आणि विश्रांतीच आपल्याला मिळत नाही. म्हणजे बºयाचदा आपण ती घेत नाही. कामावरुन घरी आल्यानंतरही टीव्ही बघणं, रात्री उशिरापर्यंत जागणं, अशा गोष्टी आपण करत असतो. आपल्याला वाटतं, ती आपली करमणूक आहे, पण ती करमणूक नव्हे, आपल्या आरोग्याशी खेळ असतो. त्यामुळे रोज किमान सहा तास तरी झोप झालीच पाहिजे. तीही विनाव्यत्यय.. बघा एकदा झोपेचं शेड्यूल लावून. वेळच्या वेळी झोपा आणि उठा.. तुमचं तुम्हालाच जाणवेल, आज मला फ्रेश वाटतंय!