शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

CoronaVirus News : कोरोनावर सापडले रामबाण औषध, IIT दिल्लीचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2020 20:20 IST

कुसुमा स्कूल ऑफ बायोलॉजिकल सायन्सच्या संशोधनात 23 मान्यताप्राप्त औषधांचा अभ्यास करण्यात आला असून, त्यात कोरोना व्हायरसवर उपचारांचा पर्याय असल्याचे दाखवण्यात आलं आहे. 

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रकोप वाढतच चालला आहे. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वच स्तरातून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. आयआयटी दिल्लीतील एका संशोधनात एक रामबाण औषध कोरोनावर प्रभावी ठरत असल्याचं समोर आलं आहे. वैद्यकीयदृष्ट्या मंजूर असलेले औषध 'टेएकोप्लानिन' कोरोनाच्या उपचारांसाठी प्रभावी पर्याय ठरू शकते आणि सध्या वापरल्या जाणा-या इतर औषधांपेक्षा दहापट जास्त प्रभावी आहे. संस्थेच्या कुसुमा स्कूल ऑफ बायोलॉजिकल सायन्सच्या संशोधनात 23 मान्यताप्राप्त औषधांचा अभ्यास करण्यात आला असून, त्यात कोरोना व्हायरसवर उपचारांचा पर्याय असल्याचे दाखवण्यात आलं आहे. आयआयटी दिल्लीचे प्रोफेसर अशोक पटेल म्हणाले, “वापरात असलेल्या इतर महत्त्वांच्या औषधांशी टेएकोप्लानिनची तुलना करताना आमच्या प्रयोगशाळेच्या परिस्थितीत सार्स-सीओव्ही-2च्या विरुद्ध लोपिनवीर आणि हायड्रॉक्सीक्लोरोक्विन यांसारख्या औषधांच्या तुलनेत टेएकोप्लानिन 10 ते 20 पट प्रभावी आहे. ”पटेल यांना संशोधनात एम्सचे डॉ. प्रदीप शर्मा यांनीही सहकार्य केले. आंतरराष्ट्रीय जर्नल ऑफ बायोलॉजिकल मॅक्रोमोलिक्यूलमध्येही हे प्रकाशित झाले आहे. टेएकोप्लानिन एक एफडीए मंजूर ग्लायको पेप्टाइड अँटिबायोटिक आहे, जे कमी विषाक्तता असलेल्या ग्रॅम-पॉझिटिव्ह बॅक्टेरियाच्या संक्रमणांच्या उपचारांसाठी वापरले जाते.टेएकोप्लानिनचा क्लिनिकल अभ्यास नुकताच रोममधील सपिएन्झा विद्यापीठात झाला, असे पटेल यांनी सांगितले. कोरोनाच्या उपचारासाठी टेएकोप्लानिनची भूमिका निश्चित करण्यासाठी अल्पवयीन, मध्यम आणि गंभीर पातळीवरील रुग्णांच्या मोठ्या वर्गावर तपशीलवार क्लिनिकल तपासणी आवश्यक आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या