शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

​डोक्यात उवा असल्यास करा हे घरगुती उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2017 12:49 IST

​डोक्यात उवा असल्यास चारचौघांमध्ये लाजल्यासारखे होते. त्यामुळे केसातील उवा, लिखा घालवण्यासाठी हे घरगुती उपाय करा...

बिग बॉसच्या घरात नुकतीच प्रेक्षकांना ढिंचॅक पूजा पाहायला मिळाली होती. पूजा ही प्रेक्षकांची लाडकी असल्याने ती बिग बॉसच्या घरात जास्त दिवस टिकेल असे सगळ्यांना वाटले होते. पण ती नुकतीच बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली. पूजा बिग बॉसच्या घरात असताना एका वेगळ्या गोष्टीची चर्चा रंगली होती. बिग बॉसच्या आजवरच्या सगळ्या सिझनमध्ये ही गोष्ट पहिल्यांदाच घडली असल्याने या गोष्टीची सोशल मीडियावर देखील चर्चा झाली होती. ढिंचॅक पूजा ही तिच्या गाण्यांसाठी प्रचंड फेमस आहेत. युट्युबवरील तिची सगळीच गाणी लोकांनी डोक्यावर घेतली आहेत. पूजाची लोकप्रियता पाहाता तिला यंदाच्या बिग बॉस सिझनमध्ये वाइल्ड कार्ड एंट्री देण्यात आली होती. पण पूजा घरात गेल्यानंतर काहीच तासात एका वेगळ्या चर्चेला उधाण आले.पूजा घरात गेल्यानंतर सगळ्यांशी गप्पा मारत असताना हितेन तेजवानीला तिच्या डोक्यात उवा आणि लिखा असल्याचे लक्षात आले. त्याने ही गोष्ट लगेचच इतर स्पर्धकांना सांगितली. त्यावर सगळ्याच स्पर्धकांनी तिच्या केसांचे निरीक्षण केले. त्यावर तिच्या डोक्यात उवा असल्याचे सगळ्यांनाच दिसले. त्यावर हितेन तेजवानीने पूजासाठी बिग बॉसकडून उवा मारण्याचे औषध देखील मागितले. केसाची निगा न राखल्यास, आठवड्याला दोनदा तरी केस न धुतल्यास केसात उवा, लिखा होतात. डोक्यात उवा असल्यास चारचौघांमध्ये लाजल्यासारखे होते. अनकवेळा या गोष्टीमुळे तुमच्या अनुपस्थितीत तुम्ही इतरांच्या चर्चेचा विषय बनतात. त्यामुळे घरातल्या घरात हे उपाय केल्यास उवा नक्कीच निघून जातात. देवाच्या पूजेसाठी जो कापूर वापरला जातो, तो कापूर तेलात उकळून ते तेल थंड झाल्यावर केसाला लावून ठेवावे आणि सकाळी केस धुवावे. तसेच कांद्याच्या रसने केसाची एक तास मालिश करावी आणि केस धुऊन टाकावे. तसेच लसूण ठेचून त्याचा रस काढून घ्यावा आणि तो रस लिंबूच्या रसात मिसळावा. हा रस रात्रभर डोक्याला लावून ठेवावा आणि सकाळी केस एखाद्या साबणाने अथवा शॅम्पून स्वच्छ धुवावेत. अशाप्रकारे एक जरी उपाय आठवडयातून तीन-चार वेळा केले तर डोक्यातील सगळ्याच उवा, लिखा निघून जातील.