शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

हृदयविकार, टेन्शन असेल, तर आधी तुमची झोप सुधारा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 15:57 IST

कहीं पे निगाहें, कहीं पे निशाणा..

ठळक मुद्देआजार जरी वेगगवेळे असले तरी त्याचा मूळ संबंध झोपेशी निगडीत असू शकतो. त्यामुळे चुकीची ट्रिटमेंट मिळते आणि मूळ आजार तसाच राहतो.शास्त्रज्ञांनी डॉक्टरांनाही सल्ला दिलाय, की असे आजार रुग्णांत आढळून आल्यनंतर तुम्ही पहिल्यांदा रुग्णाच्या झोपेची चौकशी करा आणि त्यावर इलाज करा..

- मयूर पठाडेवाट्टेल तेव्हा, वेळी अवेळी घेतलेली झोप नेहमीच अनारोग्याला आमंत्रण देते. पण या झोपेचा आपल्या आरोग्याशी नेमका संबंध तरी काय, हे तपासण्यासाठी शास्त्रज्ञांनी एक प्रयोगच केला.‘सीडीसी’ (सेंटर्स फॉर डिसिज कंट्रोल अ‍ॅण्ड प्रिव्हेन्शन) या संस्थेने तब्बल ५४ हजार लोकांचा अभ्यास केला. त्यात सारेच जण ४५ किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेले होते.या तपासणीत शास्त्रज्ञांना आढळलं, ज्या अभ्यास गटावर ही चाचणी घेण्यात आली, त्यातील ३२ टक्के लोक कमी झोपणारे होते. ६४ टक्के लोकांची झोप सर्वसाधारणपणे योग्य म्हणावी अशी होती, तर चार टक्के लोक हे गरजेपेक्षा जास्त झोपणाºयांतले होते.शास्त्रज्ञांनी सांगितलं, ज्या व्यक्ती खूप कमी आणि खूप जास्त झोपणाºयांतल्या गटात होते, त्यांच्यात आरोग्याच्या तक्रारीही तुलनेनं खूपच जास्त होत्या. हृदयविकारापासून ते टेन्शन, लठ्ठपणा, वजनवाढ, डायबेटिस.. अशा अनेक समस्यांनी त्यांना घेरलेलं होतं. त्या तुलनेत ज्यांची झोप योग्य आणि पुरेशी होती, असे लोक मात्र बºयापैकी आरोग्यदायी होते आणि त्यांच्या आरोग्याच्या तक्रारी खूपच कमी होत्या.आजार जरी वेगगवेळे असले तरी त्याचा मूळ संबंध झोपेशी निगडीत होता, हेही त्यातून लक्षात आलं. त्यामुळे बºयाचदा चुकीची ट्रिटमेंट मिळते आणि मूळ आजार तसाच राहतो. म्हणजे हृदयविकाराचा त्रास असला, लठ्ठपणामुळे तुम्ही त्रासले असाल किंवा टेन्शनमुळे वैतागला असाल, तर बºयाचदा त्याच आजारावरची ट्रिटमेंट घेतली जाते, मात्र तरीही आजार तसाच राहतो. कारण त्याचं मूळ दुसºयाच कारणात असतं. त्यामुळे शास्त्रज्ञांनी डॉक्टरांनाही सल्ला दिलाय, की असे आजार रुग्णांत आढळून आल्यनंतर तुम्ही पहिल्यांदा रुग्णाच्या झोपेची चौकशी करा आणि त्यावर इलाज करा..त्यामुळे तुम्हाला हृदयविकार असेल, तर आधी तुमची झोप सुधारा..