शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

हृदयविकाराचा झटका आला असल्यास या गोष्टी अवश्य करा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2017 13:08 IST

एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला असल्यास त्या व्यक्तीला त्वरित रुग्णायलात दाखल करावे. त्या दरम्यान पुढील गोष्टी अवश्य करून पाहाव्यात.

तुम्हाला  हृदयविकाराचा झटका आला असेल तर तुमचे शरीर तुम्हाला याचे संकेत लगेचच देते. तुमच्या शरीरात होणाऱ्या बदलांमुळे तुम्हाला हृदयविकाराचा झटका आला आहे हे तुमच्या लगेचच लक्षात येऊ शकते. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर व्यक्तीला तीन तासाच्या आत योग्य उपचार मिळाले तर त्या व्यक्तीची तब्येत सुधारण्याची नक्कीच शक्यता असते. त्यामुळे हृदयविकाराचा झटका आल्यानंतर वेळ न घालवता काहीच मिनिटांत त्या व्यक्तीला योग्य उपचार पुरवणे गरजेचे आहे. तुम्हाला हृदयविकाराचा झटका आला आहे हे पुढील गोष्टींवरून तुम्हाला कळू शकते...हृदयविकराचा झटका आल्यास तुमचा डाव हात, पाय, चेहऱ्याची डावी बाजू यांच्यात असलेली सगळी ताकद निघून जाते. तसेच तुम्हाला बोलायला आणि समोरची व्यक्ती काय बोलत आहे हे समजायचा खूपच त्रास होता. एवढेच नव्हे तर तुमच्या शरीराची एक बाजू लुळी पडल्यासारखी वाटते. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्याचा परिणाम तुमच्या डोळ्यावर होतो. तुम्हाला एका किंवा दोन्ही डोळ्यांनी व्यवस्थितपणे दिसत नाही. तसेच तुम्हाला चक्कर येते. मळमळल्यासारखे होते. ही लक्षणे दिसत असली तर तुम्हाला तातडीने उपचार घेण्याची गरज आहे हे लक्षात ठेवा.आपल्या समोर असलेल्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला आहे की नाही हे आपल्याला लगेचच कळू शकते यासाठी काही गोष्टी जरूर कराव्यात.तुमच्या समोर असलेल्या व्यक्तीला त्रास होत आहे असे तो सांगत असल्यास लगेचच डॉक्टरांना फोन करा किंवा त्याला डॉक्टरांकडे त्वरित नेण्यासाठी व्यवस्था करा. त्या दरम्यान या गोष्टी करून पाहा म्हणजे त्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला आहे का नाही हे तुम्हाला कळेल. त्या व्यक्तीला हसायला सांगा... त्याला हृदयविकाराचा झटका आला असल्यास त्याला हसता येणार नाही. तसेच त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा. बोलताना साधे शब्द बोलायला देखील त्याला त्रास होत असल्यास त्याला हृदयविकाराचा झटका आला आहे हे तुम्हाला ओळखता येईल. तसेच त्या व्यक्तीला हात उंचवायला सांगा त्याचा हात त्याला उचलता येत नसेल त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचे तुम्हाला कळेल. हृदयविकाराचा झटका आला आहे हे तुमच्या लक्षात आले तर तुम्ही रुग्णायलात पोहोचण्याच्याआधीच डॉक्टरांना त्याची कल्पना देऊ शकता आणि डॉक्टर व्यक्ती रुग्णायलात पोहोचण्यापूर्वी तुम्हाला काही उपाय सांगू शकतात.