शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

डोकं पुन्हा ताळ्यावर आणण्यासाठी करा ‘हेड, बॉडी मसाज’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 16:39 IST

नकारात्मक विचार घालवून रिफ्रेश होण्यासाठी काय कराल?

ठळक मुद्देआपल्या निराशाजनक मनस्थितीला पुन्हा ताळ्यावर आणायचं असेल, तर सर्वोत्तम उपाय म्हणजे डोक्याचा आणि शरीराचा मसाज.महिलांच्या बाबतीत मेनिक्युअर आणि पेडिक्युअरनंही चांगलाच फरक पडेल आणि एकदम फ्रेश वाटायला लागेल.निराशाजनक, त्रास देणाºया विचारांना येऊ द्या. त्यांना अडवू नका. अगदी तुम्हाला रडू आलं तरी मनसोक्त रडून घ्या. त्या भावनांना मुक्त वाट करून द्या.

- मयूर पठाडेकधी कधी आपल्याला खूप काम पडतं. मरेस्तोवर काम. कधी हे काम संपेल आणि आपण त्यातून बाहेर पडू असं आपल्याला होतं. पण ते काम संपता संपत नाही आणि संपलं तरी त्याचं यायचं ते टेन्शन येतंच. हे टेन्शन मग आपल्याला स्वस्थ बसू देत नाही. त्या टेन्शननं आपली कामगिरी बजावलेली असते आणि त्यामुळे आपल्या मूडचेही पार तीनतेरा वाजलेले असतात..अशा वेळी फार काही न करता आपल्या मनस्थितीला पुन्हा ताळ्यावर आणायचं असेल, तर सर्वोत्तम उपाय म्हणजे डोक्याचा आणि शरीराचा मसाज. घरच्या घरी आपण स्वत:, आपल्या घरातील कोणी व्यक्तीनं किंवा अगदी सलूनमध्ये जाऊनच जर तुम्ही मसाज करून घेतला तर आणखीच उत्तम. या मसाजमुळे आपण खरोखरच रिलॅक्स होतो. आपला मूड ताळ्यावर येतो. एक अनामिक शांती आपल्याला लाभते. कधी आपण खूप टेन्शनमध्ये असलो आणि कामानं बेजार झालेलो असलो तर हा उपाय नक्की करून पाहा. तो तुम्हाला नुसतं रिलॅक्सच करणार नाही, तर तो तुम्हाला नवी ऊर्जा प्राप्त करून देईल आणि नव्या उमेदीनं तुम्ही आपलं काम करू शकेल.महिलांच्या बाबतीत मेनिक्युअर आणि पेडिक्युअरनंही चांगलाच फरक पडेल आणि एकदम फ्रेश वाटायला लागेल. अगदीच काही नाही तर डोळे मिटून शांतपणे थोडावेळ पडून राहा. सगळ्या विचारांना आपल्या मनातून घालवायचा प्रयत्न करा. विचार असे सहजासहजी जात नाहीत, पण तरीही तुम्ही नक्कीच फ्रेश व्हाल.टेन्शन आल्यावर दुसरा आणखी एक महत्त्वाचा उपाय म्हणजे तुमच्या निराशाजनक, त्रास देणाºया विचारांना येऊ द्या. त्यांना अडवू नका. त्यांच्यासाठी वाट मोकळी करून द्या. अगदी तुम्हाला रडू आलं तरी मनसोक्त रडून घ्या. त्या भावनांना मुक्त वाट करून द्या. आपल्या जवळच्या कोणा तरी व्यक्तीशी त्या विषयावर बोला. साचलेलं सगळं मळभ साफ झाल्यानं, मोरीत अडकलेला बोळा निघाल्यावर साचलेलं पाणी जसं सुसाट निघून जातं, तसंच या नकारात्मक भावनाही थोड्याच वेळात कुठल्या कुठे पळून जाईल..