शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

'नवजात बालकाला कावीळ झाली तर...’; १० पैकी ८ बाळांमध्ये कावीळचे प्रमाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2023 10:29 IST

काही वेळा कावीळ आपोआप होते कमी

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अनेक वेळा बाळ जन्माला आले की, त्याला कावीळ झाल्याचे आढळून येते. बहुतांश नवजात शिशूंमध्ये कावीळ आढळून येण्याची सर्वसामान्य समस्या असली तरी त्याचे कारण शोधून काढून त्यावर उपाय करणे गरजेचे असते. तसेच १० पैकी ८ बाळांमध्ये कावीळचे प्रमाण असते. मात्र काही वेळा ही कावीळ आपोआप कमी होते. 

मात्र काही वेळा जर हे प्रमाण अधिक असेल तर त्याला मात्र योग्य उपचारांची गरज लागते. बालरोग तज्ज्ञ रक्ताच्या चाचणीच्या आधारे या काविळीचे निदान करून त्यांना गरज असल्यास योग्य ती उपचार पद्धती सुचवत असतात.

लक्षणे काय?  बाळाची त्वचा पिवळी होते.  लघवी गडद पिवळी होते.  शौचास पांढरे होते. 

काय काळजी घ्याल?  बाळाची त्वचा पिवळी पडल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला  घेणे आवश्यक  घरगुती उपचार करू नये 

नवजात बालकाला कावीळ होण्याचे कारण काय? अनुवंशिकता, दुर्मीळ आजार     मुदतपूर्व प्रसूती    आई आणि बाळाचा रक्तगट भिन्न असल्यास सुद्धा कावीळ होते    फिजिऑलॉजीकल जाँडीस  जन्मानंतर २४ तासात आणि आपोआप बरा होतो     स्तनपानाशी निगडित कावीळ     ‘ग्लुकोज ६ फॉस्फेट डिहायड्रोजनेझ’  या एन्झाइमची कमतरता     यकृताचे आजार 

या आजराचे निदान होणे गरजेचे असते. कावीळ कोणत्या प्रकारची आहे हे पाहून उपचार पद्धती निश्चित केले जातात. यासाठी अनेकवेळा रक्ताच्या चाचण्या करून बिलिरुबिनचे प्रमाण रक्ततील वाढले आहे का ? हे पहिले जाते. जर तसे आढळून आल्यास  त्यासाठी ‘फोटो थेरपी’चे उपचार सुचविले जातात. काही वेळा स्तनपान पुरेसे नसल्याने सुद्धा कावीळ होते. तर काही वेळा स्तनपानातून सुद्धा कावीळ होते. या अशावेळी निदान करून योग्य तो निर्णय घेतला जातो. काही बाळाची कावीळ आपोआप बरी होते. तर काहींना यकृताचे काही आजार असतील तर व्यवस्थित उपचारांची गरज लागते. - डॉ विजय येवले, माजी अध्यक्ष, इंडियन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक्स