शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

तुम्हीच ‘जमदग्नी’ असाल, तर मुलांनी कसं शिकावं प्रेशर हॅँडलिंग?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 17:47 IST

मुलांना तणावावर नियंत्रण ठेवायला शिकवायचं असेल पालकांना कराव्या लागतील या गोष्टी..

ठळक मुद्देमुलं आणि आपल्याबंधले बंध कायम बळकट ठेवा.मुलांचं ऐकून घेऊन प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना मदत करा.आपल्या स्वप्रतिमेची काळजी घ्या.मुलांच्या संगतीकडे लक्ष द्या.

- मयूर पठाडेज्याला आयुष्यात कधीच दु:खाचा, निराशेचा सामना करावा लागला असा एक तरी जगात आहे का? ब्रहदेवाचीही यातून सुटका झालेली नाही, मग आपण एवढे कोण तिसमारखॉँ लागून गेलो आहोत?टेन्शनच्या नावानं आपण नेहमीच गळे काढत असतो. टेन्शनमुळे मी आजारी पडलो, माझं प्रमोशन हुकलं, माझी प्रगती झाली नाही.. एक ना दोन..जे आपण बोलतो तेच आपण आपल्या मुलांमध्येही पेरत असतो.रोजच्या आयुष्यात आशा-निराशेचे प्रसंग प्रत्येकाच्याच आयुष्यात येतात. प्रत्येकालाच त्याचा सामना करावा लागतो, पण त्याच्याशी दोन हात करताना आपली भूमिका काय असते तेही महत्त्वाचं असतं.आजकाल तर लहान मुलांमध्येही आपल्या टेन्शन्स दिसतात. ते साहजिकही आहे, पण त्या त्या प्रसंगांत आपण त्यांच्याशी कसं वागतो, यालाही खूपच महत्त्व आहे.खरं तर सुरुवात आपल्यापासून झाली पाहिजे. आपल्या भावनांवर नियंत्रण राखायला आपण शिकलं पाहिजे. ते आपल्याला जमलं तर आपोआपच मुलांमध्येही त्याची रुजवात होते.तरीही या काही गोष्टी..मुलांची पिअर प्रेशर्स सांभाळताना, त्यांना त्यातून बाहेर काढताना काही गोष्टींची काळजी पालक म्हणून आपणच घेतली पाहिजे. नाहीतर जे आपल्याबाबत झालं, तेच त्यांच्याबाबतही होईल. मुलांना त्यांच्या रोजच्या आयुष्यातील पिअर प्रेशर्सबाबत प्रशिक्षित करताना पालक म्हणून तुम्ह्ी काय कराल?१- मुलं आणि आपल्याबंधले बंध कायमच बळकट राहातील याकडे लक्ष द्या.२- मुलं जेव्हा कोणतंही टेन्शन, आपला प्रश्न घेऊन तुमच्याकडे येतात, तेव्हा प्रश्न कितीही छोटा असो, त्यांचं ऐकून घ्या. हाडतूड करून त्यांना परत पाठवू नका.३- आपल्या मुलांनी कितीही चुकीचं काम केलं असेल तरी लगेच विचित्र पद्धतीनं रिअ‍ॅक्ट होऊ नका. हे जमणं तसं अवघड आहे, पण करून पाहा. शांतपणे त्याला समजावून सांगा. काही वेळा प्रयत्न करा, नक्कीच, तुम्हाला आणि त्यालाही जमायला लागेल.४- आपल्या स्वप्रतिमेचीही काळजी घ्या. आपण राक्षस, सैतान, संतापी आहोत अशी प्रतिमा मुलांच्या मनात तयार होऊ देऊ नका.५- मुलांना चांगले निर्णय घेता येतील यासाठी त्यांना तयार करा, प्रोत्साहन द्या.६- आपल्या मुलांचे मित्र कोण आहेत, त्याची संगत चांगल्या मुलांशी आहे की नाही, एकत्र असताना ते काय करतात, याकडेही वरचेवर लक्ष असू द्या, मुलांशी बोलत चला..