शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

तासाभरात तुम्ही किती अंतर चालू शकता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 17:32 IST

किती पावलं चालली म्हणजे किती किलोमीटर होतं, हे तुम्हाला माहीत आहे?

ठळक मुद्देचालण्याचा वेग ताशी चार मैल असेल तर आठ किलोमीटर अंतर चालण्यासाठी तुम्हाला साधारणपणे दीड तास लागेल.हाच वेग जर ताशी पाच मैल असेल तर एक तास लागेल.संशोधकांनी रोज दहा हजार पावलं चालण्याचा सल्ला आपल्याला दिला आहे याचं कारण आपलं आरोग्य.

- मयूर पठाडेप्रत्येक सर्वसाधारण माणसानं साधारण रोज दहा हजार पावलं चालली पाहिजेत हे आपण मागच्या लेखात पाहिलं. आपल्या आरोग्यासाठी एवढं चालणं सर्वोत्तम आहे. पण त्यासाठी किती वेळ लागतो, हे तुम्हाला माहीत आहे? किती वेळात आपण किती पावलं चालू शकतो, याचं एक ढोबळ गणीत तुम्हाला माहीत आहे?.. ते माहीत असेल तर त्याप्रमारे तुम्ही आपलं चालण्याचं गणित ठरवू शकता.सर्वसाधारण व्यक्तीचा चालण्याचा वेग; म्हणजे खूप हळूही नाही आणि खूप जोरातही नाही, असं चाललं तर आपला चालण्याचा वेग असतो सामान्यत: ताशी ५.६ किलोमीटर.याच हिशोबानं पाहिलं तर सामान्यपणे दोन हजार पावलं चालण्यासाठी, म्हणजेच १.६ किलोमीटर अंतर चालण्यासाठी आपल्याला लागतात १७ मिनिटे.दहा हजार पावलांसाठी त्यामुळे आपल्याला लागतील ८५ मिनिटं. एवढ्या वेळात तुम्ही आठ किलोमीटर अंतर चालू शकता.अर्थात प्रत्येकाचा चालण्याचा वेळ वेगवेगळा असू शकतो आणि त्यानुसार त्याला वेगवेगळा वेळ लागणार हे निश्चित..किती अंतर चालण्यासाठी किती वेळ आपल्याला लागतो ते आता पाहू.तुमचा चालण्याचा वेग ताशी चार मैल असेल तर आठ किलोमीटर अंतर चालण्यासाठी तुम्हाला साधारणपणे दीड तास लागेल. हाच वेग जर ताशी पाच मैल असेल तर एक तास लागेल.संशोधकांनी रोज दहा हजार पावलं चालण्याचा सल्ला आपल्याला दिला आहे याचं कारण आपलं आरोग्य. अर्थातच हे अंतर तुम्ही एकाच वेळी चाललं पाहिजे असं नाही. दिवसभरात हे अंतर तुम्ही कसंही चालू शकता. पूर्वी लहानसहान गोष्टींसाठी, बाजारात जाण्यासाठी, किराणा सामान आणण्यासाठी आपण पायीच जात असू. त्यासाठी कोणतीही ‘गाडीघोडा’ आपण वापरत नव्हतो. त्यामुळे साधारणपणे प्रत्येकाचंच एवढं चालणं दिवसभरात अगदी सहजपणे होत असे. आता ते होत नाही, यासाठीच आरोग्यतज्ञांचा हा सल्ला.आपला चालण्याचा वेग कसा आहे हे तपासा आणि त्याप्रमाणे दिवसभरात हे टार्गेट पूर्ण करा. निदान सुरुवात तर करा.. बघा काय फरक पडतो ते..