शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

रोज तुम्ही किती हालचाल करता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 15:16 IST

रोजची किमान शारीरिक हालचाल आवश्यकच, नाहीतर चयापचय प्रक्रियेत होइल बिघाड!

ठळक मुद्देबाहेरचं वातावरण कसंही असलं तरी आपल्या नेहमीच्या अ‍ॅक्टिव्हिटीज आपण सुरूच ठेवल्या पाहिजेत.बाहेर पडणं शक्य नसेल तर घरातल्या घरात का होईना, काही व्यायाम, शारीरिक हालचाली आपण केल्याच पाहिजेत.त्यामुळे आपलं ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि शरीर तंदुरुस्त ठेवण्यास मदत होते.

- मयूर पठाडेकाहीच काम नसलं की थंही नेहमीच हवीहवीशी वाटते. अंथरुणात पडून राहावंसं वाटतं. असंही आराम करायला सगळ्यांनाच आवडतं, पण काहीही असलं तरी आपल्या शरीराची किमान हालचाल रोज झालीच पाहिजे. जे हिवाळ्यात होतं, तेच पावसाळ्यातही होतं. हिवाळ्यामुळे आपण घरातून शक्यतो बाहेर पडत नाही आणि पावसाळ्यातली किचकिच, बाहेरची घाण आपल्याला बाहेर पडू देत नाही. पण त्यामुळे आपल्या शरीराचं आपण नुकसानच करून घेत असतो.बाहेरचं वातावरण कसंही असलं तरी आपल्या नेहमीच्या अ‍ॅक्टिव्हिटीज आपण सुरूच ठेवल्या पाहिजेत. रनिंग, वॉकिंग, स्विमिंग.. यासारख्या आपल्या नेहमीच्या अ‍ॅक्टव्हिटीज बंद पडल्या तरी घरातल्या घरात का होईना, काही व्यायाम, शारीरिक हालचाली आपण केल्याच पाहिजेत. त्यामुळे आपलं ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि शरीर तंदुरुस्त ठेवण्यास मदत होते. आपल्या शरीरातील पेशी कार्यरत राहण्यााठी त्यांचा उपयोग होतो.तज्ञांच्या म्हणण्यानुसार आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणताही ऋतु, काळ असू द्या, आपली रोजची झोप व्यवस्थित झालीच पाहिजे. रोज किमान सहा ते आठ तास झोप प्रत्येकानं घेतलीच पाहिजे. कारण त्यावरच तुमची एनर्जी, ऊर्जा अवलंबून असते. तुम्हाला जर कायम थकल्यासारखं, निरुत्साही वाटत असेल तर तुमची चयापचय शक्तीही त्यामुळे कमी होते. याच कारणामुळे इन्फेक्शनचा धोकाही मोठ्या प्रमाणावर वाढतो. तुम्ही मद्यपान करीत असाल तर या काळात तुमची तब्येत आणखीच ढासळू शकते. त्यामुळे या गोष्टींची काळजी घ्या आणि स्वत:ला ठेवा तंदुरुस्त..