शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
2
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
3
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
4
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
5
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
6
‘खरे सुख श्रमाच्या पोटीच जन्म घेते; विसरू नका!’
7
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
8
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
9
विधिमंडळाची ही आचारसंहिता; पण आमदार तसे वागतात का?
10
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
11
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
12
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
13
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
14
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
15
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
16
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात
17
लेडीज डब्यामध्ये प्रवाशाकडे बाळ देऊन महिला पसार; सीवूड स्थानकातील घटना; पोलिसांकडून तपास सुरू
18
‘न्यू इंडिया’ सप्टेंबरपर्यंत सारस्वतमध्ये विलीन; ठेवीदारांच्या व्यापक हितासाठी निर्णय : ठाकूर
19
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
20
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?

तुम्ही रोज किती ग्रॅम मिठ खाता, मोजलंय का? जास्त खाल तर पस्तावाल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 17:22 IST

आपण रोज आहारात किती ग्रॅम मिठ खातो, याचा हिशेब ठेवतो का आपण? पण तो ठेवला नाही तर तब्येतीला धोका आहे.

ठळक मुद्देरोज 5 ग्रॅम पेक्षा जास्त मिठ खाणं घातक

-निकिता महाजन

मिठ. किती महत्वाचं. ते सांडू नये, कुणाकडे मागू नये असं आपण म्हणतो. चिमूटभर मिठ जेवताना ताटात रोज वाढूनच घेतो. पण कधी विचार केलाय की, रोज आपण किती ग्रॅम मिठ खातो? ंम्हणजे किती ग्रॅम? तुम्ही म्हणाल असं मिठ काय कुणी वजनावर मोजून खातं का? खात नाहीच, पण अती मिठ खाणं म्हणजे किती आणि प्रमाणात म्हणजे किती हे तर आपल्याला माहिती हवं? जागतिक आरोग्य संस्थेच्या अभ्यासानुसार रोज पाच ग्रॅम मिठ खाणं प्रमाणात म्हणता येईल त्यापेक्षा अधिक खाणं तब्येतीसाठी घातक.युरोपिअन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजी कॉँग्रेसच्या अभ्यासानुसार मिठाचे मोजमाप हा जगभरच काळजीचा विषय  असल्याचं समोर आलं आहे.  दररोज 13.7 ग्रॅम किंवा त्यापेक्षा अधिक मिठ खाणार्‍यांना रक्तदाबासह अन्य व्याधींचा धोका अन्यांपेक्षा जास्त असतो. आणि सतत अधिक मिठ खाल्लयानं हे आजार होण्याचा संभव वाढतो. त्यापेक्षा कमी 6.8 ग्रॅम मिठ खाणार्‍यांचा धोका कमी असला तरी त्यांचं मिठ खाण्याचं प्रमाण हे सरासरीपेक्षा जास्तच आहे. त्यामुळे दिवसाला 5 ग्रॅम किंवा त्यापेक्षा कमी मिठ खाणं आरोग्यासाठी उत्तम.आता प्रश्न असा की, मिठ आपण असं ग्रॅममध्ये मोजून खात नाही. चिमूटभरच खातो. पण तरीही खारट पदार्थ न खाणं, जेवताना वरुन मिठ न घेणं हे असे नियम पाळले तरी आपल्या मिठ खाण्यावर जरा आळा घालता येईल. त्यामुळे मिठाकडे लक्ष द्या, खारट खाऊन उगीच बिपी वाढवण्यात काही हशिल नाही.