शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

आपलं कार्यालयीन मनस्वास्थ्य कसं सांभाळाल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 17:30 IST

आजच्या मानसिक आरोग्य दिनाविषयी एक चर्चा: आपल्या कार्यालयीन मानसिकतेची!

ठळक मुद्देबोला, मोकळे व्हा, कार्यालयात कुढू नका.

-मानसी जोशी

आज. 10 ऑक्टोबर. जगभर ‘मानसिक आरोग्य दिन’ म्हणून साजरा केला जातो. जगभर वाढणारी कर्मचारी लोकसंख्या अर्थात ऑफिसमध्ये जाऊन काम करणार्‍या माणसांची वाढती संख्या लक्षात घेऊन यावर्षी जागतिक आरोग्य संघटनेनं ‘कार्यालयीन मनस्वास्थ अशी या मानसिक आरोग्य दिनाची संकल्पना यंदा मांडली आहे. नोकरदार वर्ग हा जागेपणीचा बहुतांश वेळ  आपल्या कार्यालयात/ कामाच्या ठिकाणी घालवत असतो. त्यामुळे ही जागा उत्साहवर्धक, प्रोत्साहन देणारी आणि कामावर जावंसं वाटेल अशी असेल तरच व्यक्तीचं  एकंदर मानसिक स्वास्थ्य आणि पर्यायानं त्याची कामाची क्षमता आणि उत्पादन क्षमता वाढू शकेल.कार्यालयीन वातावरणच जर रटाळ असेल, कामावर जावंसं वाटत नसेल तर केवळ नाइलाज म्हणून कामावर येणार्‍यांची मनस्थिती काय असेल हे आपणही समजू शकतो.आपल्याबाबतीत असं होतंय का आपण तपासून पाहिलं पाहिजे.  त्यासाठी काय करता येईल?आणि म्हणूनच आपल्या कार्यालयीन वर्तनाचा भाग म्हणून, मनस्थितीचा भाग म्हणून आपणही काही गोष्टी करू शकतो.

1) इतरांनी तुमच्याशी ज्याप्रकारे वागावं असं वाटतं तसंच तुम्ही स्वतर्‍शी सुद्धा वागा.2) कामातून ब्रेक घ्या, स्वतर्‍वर, आयुष्यावर प्रेम करा.3) इतरांविषयी काहीतरी मनात ठेवण्यापेक्षा, इतरांना गृहित धरण्यापेक्षा, काही गृहीतकं मनाशी बाळगून ठेवण्यापेक्षा मोकळा संवाद साधा. बोला.4) आपल्या भावना दडपणं, नाकारणं किंवा अयोग्य पद्धतीने मांडणं यापेक्षा त्या सक्षमपणे व्यक्त करा.5) सहकार्याला महत्व द्या.  स्वतर्‍ची, आपल्या सहकार्‍यांची वरिष्ठांची, हाताखाली काम करणार्‍यांची देखील काळजी घ्या.6) पूर्वग्रह, गैरसमज आणि गृहीतके सोडून द्या. 7) आपल्या कामाबाबत वक्तशीर रहा. प्रामाणिक रहा. उत्तम काम करू हा विश्वास मनाशी बाळगा. 8) सर्वात महत्त्वाचं म्हणजे, काम हा आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहे, हे लक्षात घ्या. पण आयुष्यातल्या अनेक घटकांपैकी तो  एक ‘हिस्सा’ आहे. त्यामुळे आपली कामातील कामगिरी हा देखील आपल्या आयुष्याचा एक हिस्सा आहे, तेच आपलं संपूर्ण आयुष्य नव्हे, हे देखील स्वतर्‍ला सांगा, मान्य करा.

(लेखिका  मानसशास्त्रज्ञ आहेत.)