शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

किडनी ट्रान्सप्लांटपासून वाचण्यासाठी रोज घ्या एक कप कॉफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 12:53 IST

दररोजचे जीवन जगत असताना आपण  चहा कॉफी अनेकदा घेतो. कॉफी प्यायल्यास तरतरी येते. तसंच काम करण्याचा उत्साह अधिक वाढतो.

दररोजचे जीवन जगत असताना आपण  चहा, कॉफी अनेकदा घेतो. कॉफी प्यायल्यास तरतरी येते. तसंच काम करण्याचा उत्साह अधिक वाढतो. कॉफीचे सेवन केल्यास शरीरात अनेक सकारात्मक बदल घडून येतात. चला तर मग जाणून घेऊया दररोज एक कप कॉफी प्यायल्याने तुमचं आरोग्य कसं उत्तम  राहील. 

जास्तीत जास्त लोकांना कॉफी प्यायला आवडते. पण जर कॉफिचे अतिप्रमाणात सेवन केलं तर आरोग्याला धोका उद्भवू शकतो. तसंच जर कॉफीचं सेवन करत असताना ते योग्य प्रमाणात केलं तर मोठ्या आजारांपासून वाचता येऊ शकतं. कॉफीचे सेवन शरीरासाठी किती फायदेशीर आहे. या विषयावर आधारीत एक रिसर्च समोर आला आहे. 

या रिसर्च रिर्पोटनुसार कॉफी प्यायल्याने शरीरातील किडनीचे कार्य सुरळीतरित्या चालते. हा रिसर्च अमेरीकन जर्नल ऑफ किडनी डिसीज यामध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. संशोधकांच्यानुसार क्रॉनिक किडनी डिजीज ही स्थिती ज्यामध्ये किडनी हळूहळू काम पुर्णपणे थांबते. तर योग्यवेळी या समस्येचा उपचार केला नाही तर याचे रूपांतर गंभीर आजारात होते. किडनी फेल होण्याचे चान्सेस अधिक असतात. यावर उपाय म्हणून डायलिसिस किंवा किडनी ट्रान्सप्लांट करावे लागते. 

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाइजेशनच्यानुासार किडनी फेल होण्याचा आजार हा हायपरटेंशनमुळे होतो. जागतीक पातळीवरचा रिपोर्ट पाहता अनेक जीवघेणे आजार होण्याचा धोका क्रोनिक डिसीजमुळे असतो. ग्लोबल बर्डन ऑफ डिजीज (GBD) २०१५ च्या अभ्यासानुसार १.२  मिलियन मृत्यू हे कार्डीयोवॅस्कुलर आजारांमुळे झाले आहेत. 

जीमोन वाइड असोसिएशन स्टडी (GWAS) या संस्थेत सहभागी असलेले जे. केनेडी आणि त्यांच्या टीममार्फत कॉफीच्या सेवनाचा किडनीवर होणारा परिणाम याविषयी संशोधन करण्यात आले होते. या संशोधनात सुमारे २ लाख २७ हजार सहाशे ६६ रुग्णांचा समावेश होता. यात असं आढळून आले की दररोज एक कप कॉफी प्यायल्याने क्रोनिक किडनी डिसीज म्हणजेच किडनीशी निगडीत आजार उद्भवण्याचा धोका कमी असतो. कारण कॉफीच्या सेवनाने किडनीचे कार्य सुरळीत चालते. आरोग्यावर सुध्दा सकारात्मक परीणाम घडून येतो.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य