शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
2
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
3
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
4
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
5
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
6
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
7
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
8
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
9
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
10
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
11
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
12
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
13
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
14
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
15
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
16
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
18
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
19
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
20
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."

‘एचआयव्ही पॉझिटिव्ह’... ‘त्या’ दोन बहिणींसाठी टाटा रुग्णालय झाले पालक! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2022 08:25 IST

टाटा मेमोरिअल रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या इम्पॅक्ट फाउंडेशन गेली अनेक वर्षे कर्करोगाशी झुंज देणाऱ्या लहानग्यांचा आधार झालेली आहे.

- स्नेहा मोरेलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ‘एचआयव्ही पॉझिटिव्ह’... या शब्दाने जगण्याचा अर्थच बदलून जातो. या असाध्य आजाराला धैर्याने सामोरे जाताना मायेच्या माणसांनी त्यांची कायमची साथ सोडली. दुर्दैवाचा फेरा म्हणजे आधीच एचआयव्हीसह जगणाऱ्या बीडच्या दोघी बहिणींना आपल्या धाकट्या बहिणीच्या रक्ताचा कर्करोगाच्या उपचारासाठी झगडावे लागत आहे. एप्रिल महिन्यात या बहिणींचा मामा त्यांना उपचारासाठी टाटा रुग्णालयाला सोडून गेला, तो मागे फिरकलाच नाही. मात्र, अशा वेळी माणुसकीच्या मायेचा पाझर असलेल्या टाटा मेमोरिअल रुग्णालयाने निराधार बहिणींचे ‘पालकत्व’ स्वीकारत त्यांना जगण्याची नवी उमेद दिली आहे.

टाटा मेमोरिअल रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या इम्पॅक्ट फाउंडेशन गेली अनेक वर्षे कर्करोगाशी झुंज देणाऱ्या लहानग्यांचा आधार झालेली आहे. प्रतिकूल परिस्थितीशी झगडणाऱ्या या दोन बहिणींविषयी अधिक माहिती देताना इम्पॅक्ट फाउंडेशनच्या शालिनी जठिया यांनी सांगितले, मूळच्या बीड जिल्ह्यातील असणाऱ्या या दोन बहिणींना एप्रिलच्या महिन्यात त्यांचा मामा घेऊन आला होता. दोघींपैकी धाकट्या १३ वर्षांच्या मुलीला रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाल्याचे डॉक्टरांना समजले, तर १९ वर्षांची मोठी बहीणही एचआयव्हीशी संघर्ष करते आहे. या दोघींना रुग्णालयात उपचाराकरिता घेऊन आलेला मामा अचानक गायब झाल्याचे प्रशासनाला लक्षात आले, त्यावेळेस शोधाशोध केली. फाउंडेशनशी संलग्न असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनाही यासंबंधी विचारपूस करण्यास सांगितली. मात्र, पदरी निराशा आली. अखेर परिस्थितीचे भान राखून या दोघींचे पालक होण्याचा निर्णय फाउंडेशनने घेतला.

टाटा रुग्णालयाशी संलग्न असणाऱ्या धर्मशाळेत दोघी बहिणींची निवास व्यवस्था करण्यात आली आहे. या दोघींनाही एचआयव्हीची लागण झाल्याने, त्याचे उपचार सायन रुग्णालयात सुरू आहेत, याखेरीज सध्या दोघींनाही अगदी आई-वडिलांसारखेच जपण्यात येत आहे. त्यांच्या आहारापासून उपचार खर्च, औषधे, कपडे, खाऊ, आहार, वाहतूक खर्च, सुरक्षा व अन्य सर्व प्रकारची मदत टाटाकडून करण्यात येत आहे. नुकतेच ४ मे रोजी या बहिणींपैकी रक्ताचा कर्करोग झालेल्या लहान बहिणीला उपचाराकरिता टाटा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे जठिया यांनी सांगितले.

...तर निघून गेल्या असत्याबालकर्करोग रुग्णांपैकी बऱ्याचदा काही रुग्ण उपचार अर्धवट सोडतात. त्यामुळे ठरावीक प्रकरणे अगदी संवेदनशीलपणे हाताळावी लागतात, त्यातलीच हे विशेष प्रकरण आहे. दोन बहिणींचा मामा निघून गेल्यानंतर, त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. या दोघींकडे अधिकृत कागदपत्रेही नाहीत, अशात या बहिणी उपचार सोडून निघून जाण्याची शक्यता होती, परंतु त्यांचे समुपदेशन करून, संपूर्ण जबाबदारी टाटाने स्वीकारली आहे.

कुटुंबाने नाकारले टाटा रुग्णालय प्रशासनाने काही कुटुंबाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, कुटुंबाने या दोन बहिणींची जबाबदारी घेण्यास नकार दिल्याची माहिती रुग्णालयातील सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली आहे.

१३ वर्षीय मुलीची केमो थेरपी सुरूरक्ताचा कर्करोग झालेल्या मुलीला टाटा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिची केमो थेरपी सुरू आहे, तर त्या दोघींचे एचआयव्हीवरील एआरटी उपचार सायन रुग्णालयात सुरू असल्याची माहिती टाटा रुग्णालयाचे पीडियाट्रिक ऑन्कोलाॅजी विभागाचे प्रा.डॉ.माया प्रसाद यांनी दिली आहे.

टॅग्स :TataटाटाHIV-AIDSएड्स