शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अंबानी हॉस्पिटलमध्ये हेरेडिटरी कॅन्सर क्लिनिक; १० टक्के कॅन्सरमागे जेनेटिक कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2023 05:38 IST

हॉस्पिटलमध्ये यावेळी आयोजित ‘प्रिसिजन ऑन्कोलॉजी ॲण्ड पर्सनलाइज्ड मेडिसिन’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत कर्करोगाच्या नवीन प्रकारांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

मुंबई - अद्ययावत वैद्यकीय उपचार पद्धती आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सेवा देणाऱ्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलने हेरेडिटरी कॅन्सर क्लिनिक सुरू केले आहे. येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत रविवारी या क्लिनिकचे उद्घाटन करण्यात आले. या क्लिनिकमुळे कर्करोग होण्याचा धोका असलेल्या कुटुंबीयांच्या प्रोॲक्टिव्ह जेनेटिक स्क्रिनिंगमुळे कर्करोगाचे निदान होण्यास व प्रतिबंध करण्यास मदत होणार आहे.

हॉस्पिटलमध्ये यावेळी आयोजित ‘प्रिसिजन ऑन्कोलॉजी ॲण्ड पर्सनलाइज्ड मेडिसिन’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत कर्करोगाच्या नवीन प्रकारांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या परिषदेत कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलच्या अध्यक्ष टीना अनिल अंबानी यांनी भारत आणि जगभरातील ऑन्कोलॉजी क्षेत्रातील नामवंत डॉक्टर व संशोधकांचा सत्कार केला. 

प्रिसिजन ऑन्कोलॉजी आणि वैयक्तिक वैद्यकीय उपचार हे कॅन्सरमधील देखभालीतील नवे दृष्टिकोन आहेत. आनुवंशिक कॅन्सर क्लिनिक सुरू करून आम्ही अचूक ऑन्कोलॉजी आणि वैयक्तिक औषधांवर लक्ष केंद्रित करत आहोत. ज्यामुळे कर्करोगाच्या कौटुंबिक जोखमीचा अंदाज लावण्यात आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यात मदत होणार असल्याचे टीना अंबानी म्हणाल्या. यावेळी सीईओ आणि एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर डॉ. संतोष शेट्टी उपस्थित होते. भारतात दरवर्षी कॅन्सरच्या जवळपास १.४ दशलक्ष रुग्णांचे निदान होते. आनुवंशिक चाचणी हा प्रिसिजन ऑन्कोलॉजीचा एक महत्त्वाचा घटक आहे. याच्या साहाय्याने व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबातील जीन म्युटेशन्स ओळखता येतात. जनुकीय तपासणी अधिक किफायतशीर बनवण्यासाठी अंबानी हॉस्पिटलने त्याच्या खर्चामध्ये सवलत देखील दिली आहे.

जेनेटिक टेस्टिंग महत्त्वाचे का?  जेनेटिक टेस्टिंगमुळे जनुकामधील विशिष्ट बदल ओळखता येतात. संबंधित व्यक्तीला कॅन्सर होईल की नाही, याचे अनुमान लावण्यात मदत होते. आजाराचे पूर्वनिदान केले जाऊ शकते. जोखीम कमी करता येते. यासाठी टार्गेटेड थेरपी वापरता येते आणि कुटुंबातील इतर सदस्यांना किती धोका आहे, हे देखील समजून घेता येते, अशी माहिती अंबानी हॉस्पिटलच्या ऑन्कोलॉजी विभागाचे संचालक डॉ. राजेश मिस्त्री यांनी दिली. 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलcancerकर्करोग