शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

HEALTH : वृद्धापकाळात योगामुळे टळतो ‘मेमरी’ कमजोर होण्याचा धोका !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2017 13:27 IST

जास्त काळ योगा केल्याने मेंदूच्या संरचनेत बदल होतो म्हणजेच वृद्धापळात होणारे स्मृतिभ्रंश सारख्या आजारांपासून बचाव होतो.

योगाचे फायदे सर्वज्ञात आहेत. त्यामुळे योगा सेलिब्रिटींच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटकच बनला आहे. योगामुळे शरीर तर फिट राहतेच शिवाय सौंदर्यातदेखील भर पडते. या व्यतिरिक्त नव्या संशोधनानुसार, वृद्धापकाळात योगा केल्यास मेमरी कमजोर होण्याचा धोका टळतो असे आढळून आले आहे.  जर्नल फ्रंटियर्स इन एजिंग न्यूरोसाइंसच्या संशोधनात असे म्हटले आहे की, जास्त काळ योगा केल्याने मेंदूच्या संरचनेत बदल होतो म्हणजेच वृद्धापळात होणारे स्मृतिभ्रंश सारख्या आजारांपासून बचाव होतो.  शिवाय ब्राझिलच्या साओ पाउलोमधील हॉस्पिटल इजरैलिटा अल्बर्ट आइंस्टीनचे संशोधक एलिसा कोजासा यांनी म्हटले आहे की, मांसपेशींसारखेच मेंदूही प्रशिक्षणाने विकसित होत असतो.  वय वाढल्याने मेंदूची संरचना आणि कार्यक्षमतामध्ये बदल घडत असतो आणि यामुळे लक्ष, स्मृतिमध्ये कमजोरी निर्माण होते. शिवाय या दरम्यान मेंदूत एक असा बदल घडतो, ज्यामध्ये सेरेब्रल कॉर्टेक्स पातळ होतो. संशोधकांनी योगा करणाऱ्या एका वृद्ध महिलेच्या मेंदूची छायाकृती घेतली तर त्यांना तिच्या उजव्या पीफ्रंटल कॉर्टेक्समध्ये अधिक कॉर्टिकलची जाडी जास्त दिसून आली.  योग भारताची प्राचीन परंपरेची एक अमुल्य देण आहे. योगा मेंदू आणि शरीराच्या एकतेचे प्रतिक आहे, मनुष्य आणि निसर्गादरम्यान सामंजस्य आहे. विचार, संयम आणि स्फुर्ती देणारा तथा आरोग्य आणि सकारात्मकतेसाठी एक सक्षम दृष्टिकोनदेखील योगामुळेच मिळतो. वृद्धापकाळाने नियमित योगा केल्यास मेंदूच्या संरचनेत असा बदल घडत असतो. आणि हाच बदल मेमरी स्ट्रॉँग होण्यास कारणीभूत ठरतो. बहुतांश वृद्ध सेलिब्रिटी याच फायद्यामुळे नियमित योगा करीत असतात आणि आपले जीवन सुकर करीत असतात.    Also Read : मेंदू आणि शरीराच्या एकतेचे प्रतिक, योगा !