शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

HEALTH : उन्हाळ्यात ‘गॉगल’ का व कोणता वापरावा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2017 14:56 IST

आपण खरंच डोळे उघडे ठेवून गॉगल घेतो का? घेतलेला गॉगल आपल्या डोळ्यांना किती योग्य आहे, याची खात्री कधी केली आहे का?

-Ravindra Moreआज फॅशनचा ट्रेंड सुरु असून स्टायलिश राहणे कोणाला आवडणार नाही. त्यातच तरुणाईचं स्टाईलमध्ये राहण्याचं सर्वात आवडतं माध्यम म्हणजे ‘गॉगल’ होय. प्रत्येकजण त्याच्या आवडीप्रमाणे गॉगल घेतो. विशेष म्हणजे उन्हाळ्यात तर या स्टाईलला जणू उधाणच येतं. काहीजण तर दर महिन्याला गॉगल बदलतात. मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण खरंच डोळे उघडे ठेवून गॉगल घेतो का? रस्त्याच्या कडेला दिसणारे अगदी कमी किमतीचे स्टायलिश गॉगल आपण सहज विकत घेता. हे स्वस्तातील गॉगल आपल्या डोळ्यांना किती महाग पडू शकतात याची जाणिव तरी आपणास असते का? जरी आपण महागड्या दुकानावर गॉगल घेतला असेल, मात्र तोे आपल्या डोळ्यांना किती योग्य आहे, याची खात्री कधी केली आहे का? का घ्यावा गॉगल?बहुतांश लोक गॉगल फक्त स्टाइलसाठी घेत असतात. शिवाय प्रवासादरम्यान किंवा बाहेर फिरताना डोळ्यात कचरा जाऊ नये, सूर्याच्या किरणांपासून डोळ्यांचे सरंक्षण व्हावे हेदेखील गॉगल घेण्यामागचे कारण असू शकते. मात्र बरेच लोक गॉगल वापरतच नाही. खरं सांगायचे झाले तर डोळ्यांच्या सरंक्षणासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच गॉगल वापरायलाच हवा. बहुतेकजण दिवसभर उन्हातच असतात. त्यातील प्रवास करणाऱ्याची संख्या जास्त आहे. बाहेर फिरताना सूर्याच्या किरणांचा मारा आपल्या चेहऱ्यावर तसेच डोळ्यांवर होत असतो. सूर्याच्या किरणांमध्ये अल्ट्राव्हायलेट रेडियेशन असल्याने याचा परिणाम त्वचेवर होऊन अनेक समस्या निर्माण होतात. डोळ्यांच्या कोपऱ्यामध्ये सुरकूत्या पडतात, त्या सूर्याच्या अतिनिल किरणांमुळेच. म्हणून आपल्या डोळ्यांना या अतिनिल किरणांपासून वाचविण्यासाठी गॉगल वापरणे आवश्यक असते. गॉगल कोणता वापरावा?रस्त्यावरचे स्वस्त गॉगल तर मुळीच घेऊ नयेत, ते आपल्या डोळ्यांना महाग पडू शकतात. शिवाय दुकानातून घेताना १०० टक्के  अतिनिल किरणांपासून सुरक्षित असे लेबल असलेलाच गॉगल घ्यावा. काही वेळेस महागडे गॉगल्सवर असे लेबल नसते. १०० टक्के अतिनिल किरणांपासून सुरक्षित असलेला गॉगल सर्व प्रकारच्या अतिनिल किरणांपासून डोळ्यांचे संरक्षण करतो. म्हणून डोळ्यांच्या सुरक्षिततेसाठी अशाच गॉगलचा आग्रह धरावा.