शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

HEALTH : ​मुलांच्या डोळ्यांची काळजी घेताना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2017 15:42 IST

मुलांच्या दृष्टीदोषाच्या समस्या वाढताना दिसत आहेत. आपल्या घरीही लहान मुले असतील आणि त्यांची वेळीच काळजी घेणे गरजेचे आहे.

-Ravindra Moreबदलती जीवनशैलीचा परिणाम लहान मुलांच्या आरोग्यावरही होताना दिसत आहे. तेही मोबाइल, टीव्ही मध्ये व्यस्त होत असल्याने याचा परिणाम थेट त्यांच्या डोळ्यांवर होत आहे. अशा विविध कारणांमुळे  त्यांच्या दृष्टीदोषाच्या समस्या वाढताना दिसत आहेत. आपल्या घरीही लहान मुले असतील आणि त्यांची वेळीच काळजी घेणे गरजेचे आहे. काय काळजी घ्याल?आपल्या मुलाच्या डोळ्यांची तपासणी दर सहा महिन्यांनी व्हायलाच हवी. विशेष म्हणजे शाळेत पाठविण्याअगोदर तर डोळ्यांची तपासणी सक्तीने व्हायलाच हवी. शिवाय मुलांच्या डोळ्यांवर अतिरिक्त ताण येऊ नये म्हणून त्यांना जास्त वेळ टीव्ही समोर बसू देऊ नये. तसेच त्यांना शांत झोप लागेल याचीही काळजी घेणे गरजेचे असते. मुले बाहेरुन खेळून किंवा शाळेतून आल्यावर डोळे पाण्याने स्वच्छ करण्यास सांगा व या सवयीचे त्यांना महत्त्व पटवून द्या. मुलांचे डोळे लाल होत असतील आणि ते सतत डोळे चोळत असतील तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. घरीच उपचार करू नका. तसेच चष्मा वापरत असेल तर चष्म्यावर ओरखडे किंवा डाग असतील तर तसाच वापरू देऊ नका. मुलांना चष्मा नेहमी स्वच्छ ठेवण्यास सांगा. टीव्ही बघत असताना किंवा वाचत असताना प्रकाश खूप जवळ नसेल, याची खात्री करून घ्या.मंद प्रकाशाचा वापर करू नका. या सर्व काळजीबरोबरच पोषणतत्त्वयुक्त आहार घेण्यालाही आपण तितकेच महत्त्व दिले पाहीजे. डोळ्यांच्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन ए, सी, बीटा केरॉटीन, सेलेनियम आणि इतर पोषणद्रव्यांचा आहारात प्रामुख्याने समावेश असावा. तसेच गाजर, पालेभाज्या, पपई आणि द्राक्षे खाण्यास मुलांना जास्तीत जास्त प्रोत्साहन द्या.