शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

HEALTH : फॅशनचा आरोग्यावर विपरित परिणाम !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2017 16:23 IST

आपणही अतिशय घट्ट (स्किनी) जीन्स, हँड बॅग्ज, जास्त वजनाचे दागिने आणि उंच टाचेच्या चपला (हाय हिल्स) यांचा वापर करताय का?

हल्ली फॅशनचा ट्रेंड एवढा वाढला आहे की, लहानांपासून मोठ्यांपर्यत तसेच पुरुष असो की महिला सर्वचजण स्टायलिश दिसण्यासाठी प्रयत्न करतात. मात्र ही स्टाइल आपणास महाग पडू शकते. नुकतेच ब्रिटिश कॅरोप्रॅक्टिक असोसिएशनने (बीसीए) केलेल्या सर्वेक्षणात हे सिद्ध झाले आहे.सर्वेक्षणानुसार, अतिशय घट्ट (स्किनी) जीन्स, हँड बॅग्ज, जास्त वजनाचे दागिने आणि उंच टाचेच्या चपला (हाय हिल्स) याचा आपल्या शरीरावर चक्क वाईट परिणाम होतो, असे आढळले आहे.  अत्यंत घट्ट जीन्स आणि मोठं हूड असलेला कोट घातला, तर आपली काम करण्याची क्षमता कमी होते. याचा आपलं उठणं-बसणं आणि चालण्यावरही परिणाम होतो. उंच टाचेच्या चपला सांध्यांवर परिणाम करतात. यामुळे उडी मारण्यावर आणि पायी चालण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. आपली चाल मंदावते आणि उंच टाचेच्या चपला सातत्यानं वापरल्यानं आपल्याला जोरात उडीही मारता येत नाही. बीसीएच्या म्हणण्यानुसार, स्त्रियांच्या वाढत्या पाठदुखीचं कारण त्यांच्या मोठमोठ्या बॅग्ज आहेत. मोठी, वजनी सॅक घेऊन किंवा लॅपटॉप बॅग घेऊन आॅफिसला रोजचं जाणं-येणं केलं, तर त्यामुळे खांद्यांवर जास्त दाब पडतो. त्यामुळे खांदेदुखी आणि पाठदुखी दोन्ही सुरू होते.अनेकदा स्त्रिया आपल्या पेहरावानुसार बऱ्यापैकी वजनी दागिनेही वापरतात. त्यामुळेही त्यांना पाठदुखी सुरू होते. मान आणि गळ्यावरही या वजनी दागिन्यांचा ताण येतो आणि मानेचं दुखणं सुरू होऊ शकतं किंवा असलेलं वाढूही शकतं. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या जवळपास एक तृतीयांश स्त्रियांना या सर्वच गोष्टींबद्दल फारशी कल्पनाच नव्हती. या सर्वेक्षणानंतर मात्र या संपूर्ण पेहराव आणि अ‍ॅक्सेसरीजविषयी पुनर्विचार करणार असल्याचं सर्वेक्षणात सहभागी झालेल्या स्त्रियांनी सांगितलं.