Health Tips : मासिक पाळी उशिरा येण्यासाठी हे आहेत ८ नैसर्गिक उपाय, No Side Effect !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2017 15:16 IST
कित्येक महिला पीरियड्स म्हणजे मासिक पाळी उशिराने यावी म्हणून औषधे घेतात. मात्र या औषधांचा साइड इफेक्ट्स होऊन शारीरिक व्याधी निर्माण होऊ शकतात.
Health Tips : मासिक पाळी उशिरा येण्यासाठी हे आहेत ८ नैसर्गिक उपाय, No Side Effect !
-Ravindra Moreवेगवेगळ्या कारणाने कित्येक महिला पीरियड्स म्हणजे मासिक पाळी उशिराने यावी म्हणून औषधे घेतात. मात्र या औषधांचा साइड इफेक्ट्स होऊन शारीरिक व्याधी निर्माण होऊ शकतात. यासाठी शरीराला हानी पोहचू नये म्हणून काही नैसर्गिक उपायदेखील करु शकता. नॅशनल इंस्टिट्यूट आॅफ आयुर्वेद, जयपूर येथील डॉ. सी. आर. यादव मासिक पाळीच्या संभावित तारखेपासून सात दिवस अगोदर काही फूड्स खाण्याचा सल्ला देतात. यामुळे पीरियड्स ५ ते ७ दिवसापर्यंत उशिराने येऊ शकते. जाणून घेऊया कोणते आहेत ते फूड्सच्या बाबतीत. * ओवाओवाच्या पानांना पाण्यात टाकून ऊब द्या. कोमट झालेल्या या पाण्यात मध मिक्स करुन सेवन केल्याने मासिक पाळी उशिराने येते. * आवळाआवळ्याचे पावडर किंवा रसाचे सेवन केल्याने मासिक पाळी उशिराने येते शिवाय त्यानंतर होणारा त्रासदेखील कमी होतो. * तांदूळदिवसातून तिनदा तांदळाचे पाणी सेवन केल्याने मासिक पाळी उशिराने येते. * डाळिंबडाळिंबाच्या सालींना कोरडे करुन त्याचे पावडर बनवा. एक चमच पावडर पाण्यात टाकून रोज सकाळ-संध्याकाळ सेवन केल्याने मासिक पाळी उशिराने येते. * व्हिनेगरएक ग्लास पाण्यात ३ थेंब व्हिनेगर टाकून दिवसातून तीन-चारदा सेवन केल्याने मासिक पाळी उशिराने येते. * कडू पडवळरोज कडू पडवळची भाजी बनवून सेवन केल्यास मासिक पाळी उशिराने येते. * हरबराची दाळ हरबऱ्याच्या दाळीचे पिठ पाण्यात मिक्स करुन सेवन केल्याने मासिक पाळी उशिराने येते. सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी सेवन केल्यास अधिक फायदेशीर ठरते. * पुदीनादिवसातून दोनदा पुदीनाचा रस सेवन केल्याने मासिक पाळी उशिराने येते