शहरं
Join us  
Trending Stories
1
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
2
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
3
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
4
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
5
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
6
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
7
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
8
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
9
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
10
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
11
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
12
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
13
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
14
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
15
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
16
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
17
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
18
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
19
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...
20
ऐकावं ते नवलच! २४ लाख रुपये खर्चून बनवलेला तलाव चोरीला गेला? शोधून काढणाऱ्याला गावकरी देणार बक्षीस

HEALTH : ​उन्हाळ्यात त्वचेची अशी घ्या काळजी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2017 18:09 IST

आपण सुंदर दिसावे असे प्रत्येकाला वाटते, मात्र उन्हाळ्याचा त्वचेवर परिणाम होतो.

-Ravindra Moreउन्हाळ्याची चाहुल लागली असून कडक उन्हाळा सुरु होण्यापूर्वीच आपल्या सौंदर्याबाबत जागृत असायला हवे. विशेषत: उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेणे आवश्यक असते. कारण त्वचेची पोत कशी आहे, यावरच आपले सौंदर्य ठरत असते. आजच्या सदरता उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी याबाबत जाणून घेऊया.* ओठांच्या सुरक्षिततेसाठी शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने उन्हाळ्यात हिवाळ्यापेक्षा ओठ अधिक कोरडे पडतात. यासाठी एसपीएफ जास्त असलेले लिप बाम वापरा. यामुळे तुमचे ओठ कोरडे राहणार नाहीत. * डोक्यावर मोठी टोपी सूर्यकिरणांपासून चेहऱ्याच्या त्वचेचे संरक्षण व्हावे यासाठी प्रवास करताना किंवा बाहेर फिरताना डोक्यावर मोठी टोपी आवश्यक आहे. यामुळे सूर्यकिरणांपासून संरक्षण तर होईल शिवाय तुम्ही स्टायलिशही दिसाल. * मॉईश्चरायझरजास्त एसपीएफ असलेले मॉईश्चरायझर दिवसभर लावून राहा. शिवाय आपल्या बॅगमध्ये जास्त एसपीएफ असलेले कॉम्पॅक्ट पावडर ठेवा. मॉईश्चरायझर लावल्यानंतर लावायला कॉम्पॅक्ट कामी येईल. * वारंवार पाणी प्याउन्हाळ्यात खूप घाम येत असल्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. याचा परिणाम आपल्या त्वचेवर होतो. यासाठी शरीरातील पाण्याची कमी भरून काढण्यासाठी वारंवार पाणी प्या. सोबत ज्यूस, लिंबूपाणी किंवा पाण्याची बॉटल बाळगणे अधिक चांगले. * हाताच्या त्वचेची काळजी घ्याबाहेर फिरताना किंवा दुचाकी वाहन चालविताना आपल्या हाताच्या त्वचेवर सूर्यकिरणांचा संपर्क आल्याने हातावरची त्वचा काळवंटते. शिवाय नकळत आपले हात टॅन होतात. यासाठी वरचेवर हातांना हॅन्ड क्रीम लावा. * सनग्लासचा वापर कराउन्हाळ्यात सूर्यकिरणांचा डोळ्यांवरही परिणाम होत असतो. यासाठी डोळ्यांना ग्लेअर्स, गॉगल्स, शेड, रिफ्लेक्टर्स आणि एव्हिएटर्सची गरज भासते. म्हणून आपले सनग्लासेस सतत जवळ ठेवा.