HEALTH : उन्हाळ्यात पित्त आणि डोकेदुखीचा त्रास सतावतोय? करा हे घरगुती उपाय !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2017 15:34 IST
उन्हाळ्यात असा त्रास जाणवल्यास बाहेरील उपचार करण्याऐवजी हे उपाय करा...!
HEALTH : उन्हाळ्यात पित्त आणि डोकेदुखीचा त्रास सतावतोय? करा हे घरगुती उपाय !
-Ravindra Moreउन्हाळा सुरु झाला असून त्याबरोबरच अनेक शारीरिक व्याधीही डोके वर काढु लागल्या आहेत. विशेषत: उन्हाळ्यात भूक मंदावते. जेवणाची इच्छा होत नाही, तरीपण सुट्यांचा काळ असल्याने बऱ्याचदा बाहेरचे खाणे-पिणे होते. यामुळे वाढत्या उन्हाच्या त्रासाबरोबरच पचनसंस्थेसंबंधी अपचन, मळमळ, पित्त, उलट्या होणं, डीहायड्रेशन, भोवळ येणं आदी समस्या सतावू लागतात. आजच्या सदरात उन्हाळ्यात वाढणारी डोकेदुखी आणि पित्त या समस्यांवर काय घरगुती उपाय कराल, याविषयी जाणून घेऊया.उन्हाळ्यात फ्रिजच्या पाण्याऐवजी माठातील पाण्याचा वापर करा. शिवाय तहान लागण्याची वाट न पाहता जशी आठवण येईल तसे मुबलक पाणी प्या. मूत्रविसर्जनाच्या वेळेस काही त्रास न होता त्याचा रंगदेखील अधिक पिवळसर नसेल याची काळजी घ्या. पाण्यामुळे शरीराचे तापमान सुरळीत राहण्यास मदत होते. उन्हाळ्याच्या दिवसात दुपारच्या जेवणात किंवा मधल्या वेळेत भूक लागल्यास आंबा खा. मधूमेहीदेखील कॅलरीचे गणित सांभाळत आहारात आंब्याचा समावेश अवश्य करू शकतात. आंब्यामध्ये व्हिटॅमिन बी मुबलक आढळते. यामुळे शरीरातील नसा शांत राहतात. तसेच तुम्हांला दिवसभर उत्साही ठेवण्यास मदत होते. नाश्त्यानंतर आणि दुपारच्या जेवणाआधी कोकम सरबत आणि सब्जाचे मिश्रण मिसळून प्या. यामुळे शरीरात इलेक्ट्रोलाईट्सचे प्रमाण संतुलित राहण्यास मदत होते. दुपारच्या जेवणात शक्य असल्यास दही भात खाण्याची सवय ठेवा. यामुळे शरीराला प्रोबायोटिक्स मिल मिळेल तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित राहण्यास मदत होते. रात्री झोपण्यापूर्वी गुलकंद आणि दूधाचे मिश्रण एकत्र करून प्यावे. दूध हे नैसर्गिकरित्या थंड स्वरूपाचे असल्याने शरिरातील उष्णता कमी करते तसेच शांत झोपण्यास मदत करते.Also Read : HEALTH : उष्माघात टाळण्यासाठी अशी घ्या काळजी ! HEALTH : उन्हाळ्यात घामाने त्रस्त आहात? वापरा हे घरगुती उपाय !