शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

​Health : योगासने सुरु करण्यापूर्वी...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2017 15:33 IST

बहुतांश सेलेब्स ताणतणाव दूर करण्यासाठी आणि फिट राहण्यासाठी योगाचा आधार घेतात, विशेष म्हणजे त्यातील काही सेलेब्स स्वत: तर करतातच शिवाय त्यांच्या फॅन्सलाही योगासने करण्याचा सल्ला देतात. त्यानुसार आपण योगासने करु लागतो, मात्र एका अभ्यासानुसार योगासने सुरु करण्यापूर्वी योग्य काळजी घेणे आवश्यक असते.

-रवींद्र मोरे बहुतांश सेलेब्स ताणतणाव दूर करण्यासाठी आणि फिट राहण्यासाठी योगाचा आधार घेतात, विशेष म्हणजे त्यातील काही सेलेब्स स्वत: तर करतातच शिवाय त्यांच्या फॅन्सलाही योगासने करण्याचा सल्ला देतात. त्यानुसार आपण योगासने करु लागतो, मात्र एका अभ्यासानुसार योगासने सुरु करण्यापूर्वी योग्य काळजी घेणे आवश्यक असते. तणाव आणि मानसिक रोग यासारखे आजार दूर करण्यासाठी योगा हा एक उत्तम उपाय आहे. योगामुळे शरीर स्वस्थ राहते आणि त्याबरोबर तणावासंबंधित हॉर्मोनला नियंत्रित करण्यासदेखील मदत करतो, असे आरोग्य तज्ज्ञ म्हणतात.शिवाय उच्च रक्त दाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉल आणि लठ्ठपणा यासारख्या समस्येवर योगा हा रामबाण उपाय आहे. योगा हा आयुष्य जगण्याचा एक चांगला मार्ग आहे, असे सांगण्यात येते. रोग झाल्यानंतर त्याच्यापासून सुटका होण्यासाठी लोक अँलोपॅथीची औषधं खावेत की योगा करावा अशा द्विधा मनस्थितीत असतात. पण लोकांना हे समजणे गरजेचे आहे की, मानवाच्या आयुष्यातील प्रत्येक रोगावर योगा हे एक उत्तम औषध आहे. लोकांना ७० टक्यांपेक्षा जास्त रोग हे त्यांच्या बदलत्या जीवनशैलीमुळे होतात. त्यावर एकच उपाय आहे. योगामुळे तुमचे जीवन हे आनंदी आणि सुखी राहिल्यामुळे रोग होण्याचे प्रमाण ३० टक्क्यांनी कमी होते. योगाचे हे महत्त्व लक्षात घेऊनच बहुतांशजण योगाभ्यासास सुरुवात करतात. मात्र योगाचा प्रवास सुरू करण्यापूर्वी योग मार्गदर्शकाचा सल्ला व मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे. त्याबरोबरच शारीरिक तपासणी करणे देखील आवश्यक आहे. योगाभ्यास सुरू करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरकडून सल्ला घ्या. काही योगक्रिया एखाद्या विशिष्ट आजाराने ग्रस्त असणाऱ्यांसाठी योग्य नसतात. त्यासाठी सुरुवातीलाच तुम्ही शारीरिक तपासणी करणे गरजेचे आहे.लक्षात ठेवा, तुम्हाला एखाद्या गंभीर आजार असल्यास तो पूर्णपणे बरा झाल्यानंतरच योग क्रिया करणे योग्य ठरेल. कुठलीही योग क्रिया सुरू करण्याआधी हृदयरोगींनी त्यांच्या डॉक्टरांचा आणि योग शिक्षकाचा सल्ला घेणे योग्य ठरेल. सायनस इंफेक्शनने त्रस्त असाल तर सर्वांगासन करू नये. रक्तदाबाचा त्रास असेल तर योग करण्याआधी तुमचा रक्तदाब सामान्य स्थितीत असणे गरजेचे आहे. अशा लोकांनी शरीराचा पूर्ण भार डोक्यावर येतो अशी आसने करणे टाळावेत. कारण या आसनांनी रक्ताभिसरण मेंदूच्या दिशेने होते. योगाचा अभ्यास कोणताही आजार बरा होण्यासाठीही करू शकता.लक्षात घ्या अंगकाठीने कमजोर प्रकृती असणाऱ्यांनी योग सुरू करण्याआधी दोन गोष्टींकडे लक्ष द्यावे. एक म्हणजे डॉक्टरचा सल्ला घ्यावा आणि दुसरे म्हणजे योगाभ्यास सुरुवात करण्यासाठी सुरुवातीला पाच महिने साधीच आसने करावीत. नंतर इतर योगासने सुरू करू शकता.