HEALTH : म्हणून प्रेग्नन्सीदरम्यान प्यावे जिऱ्याचे पाणी !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2017 11:37 IST
जिऱ्यातील गुणधर्मामुळे आपणास बऱ्याच आजारांना लढण्याची शक्ती मिळते. शिवाय प्रेग्नंट महिलांना जिऱ्याचे पाणी प्यायला दिल्यास खूपच फायदेशीर ठरते असे एका अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.
HEALTH : म्हणून प्रेग्नन्सीदरम्यान प्यावे जिऱ्याचे पाणी !
-Ravindra Moreजेवणाचा स्वाद वाढविण्यासाठी त्यात जिरे टाकले जाते. जीऱ्यातील गुणधर्मामुळे आपणास बऱ्याच आजारांना लढण्याची शक्ती मिळते. शिवाय प्रेग्नंट महिलांना जिऱ्याचे पाणी प्यायला दिल्यास खूपच फायदेशीर ठरते असे एका अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. प्रेग्नंसीदरम्यान जिऱ्याचे पाणी पिल्यास आई व बाळ दोघांसाठी उपयुक्त ठरते. जिऱ्याचे पाणी बनविताना १ लिटर पाणी उकाळून त्यात १ चमचा जिरे मिक्स करावे. त्यानंतर पाण्याला गार करुन त्याला गाळणीने गाळून घ्यावे. * काय होतील फायदे* एनिमियापासून बचावजिऱ्याचे पाणी रक्तात हिमोग्लोबिन वाढविण्याचे काम करते. कारण जिऱ्यामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. * बाळामध्ये जन्मदोषाचा धोका टाळाबाळामध्ये जन्मदोषाचा धोका टाळण्यासाठी प्रेग्नंट महिलेने रोज जिऱ्याचे पाणी प्यावे. * ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतेजिऱ्यामध्ये पोटॅशियमचे प्रमाणही चांगले असते, ज्यामुळे ब्लड पे्रशर नियंत्रणात राहण्यास मदत होते. * रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत जिऱ्यामध्ये लोहाचे प्रमाण असल्याने त्यामळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. याशिवाय विटॅमिन ए, सी आणि अॅन्टिआॅक्सिडेंटचेही प्रमाण असल्याने शरीरात ऊर्जा निर्माण होते. * अॅसिडिटीपासून मुक्तताप्रेग्नन्सीदरम्यान बऱ्याच महिलांच्या पोटात अॅसिडिटीची समस्या निर्माण होत असते. मात्र जिऱ्याचे पाणी पिल्याने हा या त्रासापासून मुक्तता मिळू शकते.