शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

HEALTH RESEARCH : रोज दहीचे सेवन केल्यास हाडे मजबूत होण्यास मदत !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2017 15:07 IST

दुग्धजन्य पदार्थ आणि हाडांचा कमकुवतपणा याबद्दलचे हे आतापर्यंतचे सर्वात मोठे संशोधन आहे.

एका नव्या अभ्यासात रोज दहीचे सेवन केल्यास हाडे मजबूत होण्यास मदत होऊन हाडांच्या आरोग्यातही सुधारणा होत असल्याचे आढळले आहे. दह्यामध्ये हाडांना आवश्यक असणारी पोषक द्रव्ये असतात, ज्यामुळे हाडांचा ठिसूळ होण्यापासून बचाव होतो. दुग्धजन्य पदार्थ आणि हाडांचा कमकुवतपणा याबद्दलचे हे आतापर्यंतचे सर्वात मोठे संशोधन आहे. त्यानुसार, आहारामध्ये दह्याचे प्रमाण वाढवल्यामुळे हाडांची घनता वाढते. तसेच त्यामुळे वृद्ध महिला आणि पुरुषांमधील हाडे ठिसूळ होण्याचे (आॅस्टिओपोरोसिस) प्रमाण कमी होत असल्याचे दिसून आले.संशोधकांनी अभ्यासात सहभागी झालेल्या १ हजार ५७ महिला आणि ७६३ पुरुषांना एक प्रश्नावली दिली होती. यामध्ये जे लोक आठवड्यातून दोन-तीन वेळा, दररोज आणि कधीही दही न खाणाºयांची यादी करण्यात आली. तसेच यामध्ये इतर दुग्धजन्य पदार्थ, मांस, मासे, धूम्रपान, मद्यपान करणे आणि इतर हाडांच्या आरोग्याला प्रभावित करणाऱ्या घटनांचा अभ्यास करण्यात आला. शरीरातील कॅल्शियम अथवा जीवनसत्त्व ‘ड’ची मात्रा कमी झाल्यामुळे हाडांची झीज होण्यास सुरुवात होते. ती कमी होऊ नये, यासाठी दूध आणि दुग्धजन्य पदार्थ घ्यावेत. दही घेण्यामुळे हाडे ठिसूळ होण्याचा धोका ५२ टक्क्यांनी कमी होत असल्याचे संशोधकांना आढळून आले.Also Read : ​ब्लड प्रेशरवर दहीचा उपाय