शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
7
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
8
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
9
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
10
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
11
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
12
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
13
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
14
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
15
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
16
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
17
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
18
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
19
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!

HEALTH : जाणून घ्या ताकाचे १५ फायदे !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2017 15:56 IST

उन्हाळ्यात शरीरातील पाणी घामावाटे बाहेर पडत असल्याने शरीराला जास्तीत जास्त पाण्याची आवश्यकता असते. अशा वेळेस सहज उपलब्ध होणारा आणि अतिशय आरोग्यदायी पदार्थ किंवा शीतपेय म्हणजे ताक.

-Ravindra Moreउन्हाळ्यात शरीरातील पाणी घामावाटे बाहेर पडत असल्याने शरीराला जास्तीत जास्त पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी शरीरात पाणीयुक्त घटक जास्त जाणे आवश्यक असते. यासाठी शरीराला गारवा मिळावा पाण्याचे प्रमाण समतोल राहावे म्हणून वेगवेगळे शीतपेय घेतले जातात. अशा वेळेस सहज उपलब्ध होणारा आणि अतिशय आरोग्यदायी पदार्थ किंवा शीतपेय म्हणजे ताक. ताक हे आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त असून त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत.1. उन्हाळ्यात जीरपूडसोबत ताकाचे सेवन केल्याने पचन क्रिया व्यवस्थित राहते.2. वजन कमी करण्यासाठी ताकात काळं मीठ मिसळून पिण्याने फायदा होतो.3. उच्च रक्तदाब असल्यास गिलोय (अमृत वल्ली) चूर्ण ताकासोबत सेवन केल्याने फायदा होतो.4. नियमीत ताकाचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते.5. सकाळ-संध्याकाळ ताक पिण्याने स्मरण शक्ती वाढते.6. वारंवार उचकी येत असल्यास ताकात एक चमचा सुंठ मिसळून सेवन केल्याने फायदा होतो.7. मळमळणे, उलटी येणे अशी लक्षणे असल्यास ताकात जायफळ उगाळून पिण्याने फायदा होतो.8. सौंदर्य समस्यांसाठी ताक हे फायद्याचे आहे. ताकात आटा मिसळून तयार केलेला लेप त्वचेवर लावल्याने त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात.9. गुलाबाचे रूट दळून ताकात मिसळून तयार केलेला लेप चेहऱ्यावर लावल्याने पिंपल्स नाहीसे होतात.10. जर आपण अती ताण असलेल्या स्थितीत असाल तर नियमित ताकाचे सेवन करणे आपल्यासाठी योग्य राहील. याने शरीरासह डोक्यातील उष्णताही कमी होते.11. शरीराचा एखादा भाग जळल्यावर लगेच ताक लावल्याने फायदा होतो.12. खाज सुटत असल्यास अमलतासाचे पान पिसून ताकात मिसळून त्याचा लेप शरीरावर लावावा. काही वेळाने स्नान करावे. खाजेपासून मुक्ती मिळेल.13. विष सेवन केलेल्याला वारंवार फिकट ताक पाजल्याने लाभ होतो.14. विषारी किड्याने चावल्यास ताकात तंबाखू मिसळून लावल्याने आराम मिळतो. तरी डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य.15. टाचा फाटल्यास ताक काढल्यानंतर निघणारं लोणी लावायला हवं.