शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

Health : ​‘थायरॉइड’ने त्रस्त असाल तर चुकूनही खाऊ नका हे पदार्थ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2017 12:02 IST

थायरॉइडची समस्या असल्यास आहाराचे काही पथ्य सांगण्यात आले आहेत. चला जाणून घेऊया की या समस्येदरम्यान कोणत्या खाद्यपदार्थांपासून लांब राहावे.

दिवसेंदिवस थायरॉइड समस्येने त्रस्त होणाऱ्याची संख्या वाढतच आहे. विशेष म्हणजे ही समस्या पुरुषांच्या तुलनेने महिलांमध्ये जास्त दिसून येते. थायरॉइडमुळे बहुतांश लोकांचे वजन वाढते आणि ही समस्या अजून बिकट होते. थायरॉइडची समस्या असल्यास आहाराचे काही पथ्य सांगण्यात आले आहेत. चला जाणून घेऊया की या समस्येदरम्यान कोणत्या खाद्यपदार्थांपासून लांब राहावे. * मद्यपान थायरॉइडमध्ये झोप न येण्याची समस्या उद्भवते. झोप येत नाही म्हणून आपण बऱ्याचदा मद्यप्राशन करतो. यामुळे समस्या अजून वाढते. सोबतच मद्यप्राशन केल्याने ओस्टियोपोरोसिसचा धोकादेखील वाढतो. * कॉफीही समस्या असल्यास कॉफीचेही सेवन टाळावे. कॉफीतील कॅफीनचा थायरॉइडवर सरळ प्रभाव पडत नाही मात्र थायरॉइडमुळे उद्भवणाऱ्या समस्या वाढतात आणि अस्वस्थता वाढते. * लाल मांस (रेड मीट) थायरॉइड झाल्यावर लाल मांस (रेड मीट) अजिबात खाऊ नये. रेड मीटमध्ये कोलेस्ट्रॉल आणि सेचुरेटेड फॅट असते, ज्यामुळे वजन वाढते. शिवाय याच्या सेवनाने रुग्णांना खाजेचा त्रास होऊ शकतो. * वनस्पती तूप वनस्पती तूप चांगल्या कॉलेस्ट्रॉलला नष्ट करुन वाईट कॉलेस्ट्रॉलच्या वाढीस चालना देते, आणि याचा थायरॉइडवर प्रभाव पडतो. * आयोडीनहायपोथायरॉइडच्या अवस्थेमध्ये आपण आयोडीनचे सेवन करु नये. शिवाय समुद्र पदार्थ आणि आयोडीनयुक्त मीठाचा वापर कटाक्षाने टाळावे.